File Photo : Water Issue
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरामध्ये येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणीपुरवठा वितरणातील पायाभूत सुविधांच्या व्यवस्थेच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. तसेच भवानी पेठेतील हरकानगर जलवाहिनीवर काम करण्यात येणार असल्यामुळे देखील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुरुवारी पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट येणार आहे.
पुणे महानगरपालिकेद्वारे गुरुवार (२६ डिसेंबर) हरकानगर भवानी पेठेत काम केले जाणार आहे. भवानी पेठेतील पार्वती एमएलआर टाकीच्या पाईपलाईनवर ४५० मिमीचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. पालिकेचे कर्मचारी ३०० मिमीचा पाईप ५०० मिमी पाईपला जोडण्याचे कामही करणार आहेत. पाणी वितरण व्यवस्थेसाठी बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि पाईप कनेक्शन जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे. तेव्हा पाणीपुरवठा होणार नसल्याने पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे उद्या गुरुवारी (दि.26) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर पुढे शुक्रवारी (२७ डिसेंबर) सकाळी उशिराने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुण्यातील पार्वती एमएआर टाकी, शंकरशेठ रोड, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडियम, लक्ष्मीनारायण टॉकीज (मागचा भाग), पार्वती दर्शन (काही भाग), मित्र मंडळ कॉलनी (काही भाग, सारस बाग, खडकमल अली, शिवाजी रोड, मुकुंद नगर, महर्षी नगर (काही भाग), टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज, मीरा आनंद परिसर आणि श्रेयस सोसायटी या भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाहतुक काेंडी साेडविण्यासाठी ‘माेबिलीटी प्लॅन
पुणे महानगर पालिकेत नव्याने काही गावे सामील झाली आहे. हद्दीमध्ये नवीन सामील झालेल्या गावांतील मिळकत कर वसुलीला दिलेल्या स्थगितीसंदर्भात पुढील महीन्यात राज्य सरकार बैठक घेणार आहे. तसेच शहराची वाहतुक काेंडी साेडविण्यासाठी ‘माेबिलीटी प्लॅन’ तयार करण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये ‘‘पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील मिळकत कर वसुली थकली आहे. मिळकत कर आकारणीवरून ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या हाेत्या. त्यानंतर राज्य सरकारने या गावांतील मिळकत कर वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा परीणाम महापािलकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर हाेत आहे. त्याचवेळी समाविष्ट गावांतही नागरी सुविधा पुरावयच्या असल्यामुळे कर मिळाला पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आली आहे.