बीडमधील वाढत्या परवाना शस्त्रधारकांबाबत अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला (फोटो - नवराष्ट्र)
बीड : राज्यामध्ये सध्या बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यावरुन जोरदार चर्चा रंगली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडमुळे प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. अंजली दमानिया यांच्या निशाण्यावर मंत्री पंकजा मुंडे व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अंजली दमानिया यांनी बीडमधील शस्त्र धारकांची गंभीर माहिती देखील समोर आणली आहे.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे कायद्याची भीती राहिली नसल्याचा आरोप केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील बीड दौरा करुन परिवाराला भेट दिली आहे. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचे नाव पुढे येत असून त्याला अटक करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच बीडमध्ये अनेकजण परवान्याशिवाय बंदुका वापरुन दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडमध्ये शस्त्र परवानाधारक यांची माहिती अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली आहे. अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, बीडमध्ये पिस्तुलांची थैमान? 1222 शस्त्र परवानधारक? इतक्या प्रचंड प्रमाणात, शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत 32 आहेत तर अमरावती ग्रामीण मधे 243 शास्त्र परवाने आहेत. मग बीड मधे इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वर्धस्ताने? 1222 अधिकृत शास्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील? वाल्मिक कराड ह्यांच्या नावावर लाइसेंस आहे पण त्यांच्याच गटातले कैलाश फड व निखील फड या दोघांकडे कोणतही लाइसेंस नाही. मी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तात्काळ अटक करावी आणि ह्या कराड गैंग ला पहिला दणका द्यावा. या सगळ्या परवान्यांची तत्काळ चौकशी लावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
बीड मधे पिस्तुलांची थैमान ?
१२२२ शास्त्र परवानधारक ?
इतक्या प्रचंड प्रमाणात, शास्त्र परवाने का देण्यात आले?
परभणीत ३२ आहेत तर अमरावती ग्रामीण मधे २४३ शास्त्र परवाने आहेत. मग बीड मधे इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वर्धस्ताने? १२२२ अधिकृत शास्त्र परवाने मग अनधिकृत किती… pic.twitter.com/9L2eQqtdQQ
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 24, 2024
क्राईम न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विरोधक महाविकास आघाडीने देखील बीडमधील मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. अखिल चित्रे यांनी लिहिले आहे की, ‘गैंग्स ऑफ बीड’चे धनी कोण..बीडमध्ये हजारो पिस्तुल परवाने मागितले का जात आहेत? त्या पिस्तुलाच्या परवाना शिफारशींमागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हेच पिस्तुलधारी गुंड, त्याची 20-22 वर्षाची पोरं सणाला हवेत गोळीबार केल्याचे व्हिडीओ व्हायरल करतात पण त्यांच्यावर कारवाई का नाही? हे पिस्तुलधारी विरोधकांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात, पोलिसांशी अरेरावी करतात, कमरेला पिस्तूल लावून फिरतात… बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या ह्या गुंडांचा ‘धनी’ महायुती सरकारला का सापडत नाही? राज्य सरकार कुणाला पाठीशी घालत आहे? आणि का? असा हा कोण माणूस आहे जो महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेपेक्षा मोठा आहे? तो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे का? तसं असेल तर महाराष्ट्राने कारवाईची अपेक्षा करूच नये का? हे सर्व प्रश्न महाराष्ट्र जंगलराजच्या दिशेने जातोय कि काय अशी परिस्थिती निर्माण करत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री सन्मा. देवेन्द्रजी उत्तर द्या, अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली आहे.
‘गैंग्स ऑफ बीड’चे धनी कोण..
बीडमध्ये हजारो पिस्तुल परवाने मागितले का जात आहेत? त्या पिस्तुलाच्या परवाना शिफारशींमागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हेच पिस्तुलधारी गुंड, त्याची २०-२२ वर्षाची पोरं सणाला हवेत गोळीबार केल्याचे व्हिडीओ व्हायरल करतात पण त्यांच्यावर कारवाई का नाही? हे… pic.twitter.com/BQKbKVXfrS— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 25, 2024
अगदी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील आमदार सुरेश धस यांनी देखील बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर सुरु असल्याचा आरोप केला होता. सुरेश धस म्हणाले होते की, “बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर सुरू आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. आरोपी लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकासारखा छोटा आका आहे. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी बीडचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे बीडचे विद्यमान आमदार व माजी पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.