Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Floods: पहिल्याच पावसात पुणे तुंबले; हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला? प्रमोद भानगिरेंचा थेट सवाल

Shivsena Protest: मुळा-मुठा नदीतील वाढत्या जलपर्णीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी चक्क अंगावर जलपर्णी परिधान केली होती. "मी पुण्यातली जलपर्णी… मला कधी काढणार?" अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 10:26 AM
Pune municipal corporation protest Shiv Sena, Pramod Nana Bhangire halla bol morcha,

Pune municipal corporation protest Shiv Sena, Pramod Nana Bhangire halla bol morcha,

Follow Us
Follow Us:
  • पहिल्याच पावसात पुणे शहरातील रस्ते, चौक, नाले आणि ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्या
  • पहिल्याच मुसळधार पावसात पुण्यातील अनेक भाग जलमय झाले असून, रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले
  • पावसाळापूर्व कामांवर हजारो कोटींच्या निविदा काढल्याचा दावा करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार
Pune Floods In First Rain: पहिल्याच पावसात पुणे शहरातील रस्ते, चौक, नाले आणि ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेवर (PMC) अत्यंत आक्रमक पद्धतीचा ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात आला. शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शेकडो संतप्त शिवसैनिकांनी थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पुणेकरांना होड्या वाटा म्हणत शिवसैनिकांचा संताप

ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करा नाहीतर पुणेकरांना होड्या वाटा, पुणेकरांना पावसात बुडवणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो अशा संतप्त घोषणांनी आज महापालिका परिसर दणाणून गेला होता. पहिल्याच मुसळधार पावसात पुण्यातील अनेक भाग जलमय झाले असून, रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. पावसाळापूर्व कामांवर हजारो कोटींच्या निविदा काढल्याचा दावा करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पहिल्याच पावसात उघड झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचे मोठे ‘राजकीय धक्कातंत्र’; आणखी एक पक्ष थेट शिंदेसेनेत विलीन होणार?

हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला? प्रमोद भानगिरे यांचा सवाल!

यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ते म्हणाले, महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्व कामांसाठी हजारो कोटींच्या निविदा काढल्या, वर्तमानपत्रांत मोठ्या जाहिराती दिल्या; मात्र प्रत्यक्षात एकही काम वेळेत आणि दर्जेदार झालेले नाही. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात संपूर्ण पुणे शहर पाण्यात बुडाले. हा हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला, याचा जाब आता पुणेकर विचारणार आहेत. पुणेकरांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही.

आंदोलनातील हे दोन विषय ठरले चर्चेचा केंद्रबिंदू

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने प्रतीकात्मक होड्या भेट देण्यात आल्या.

मुळा-मुठा नदीतील वाढत्या जलपर्णीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी चक्क अंगावर जलपर्णी परिधान केली होती. “मी पुण्यातली जलपर्णी… मला कधी काढणार?” अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च फक्त कागदावरच दाखवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेना म्हणजेच शिंदे गटच ! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला

या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर घुले, माजी नगरसेविका सोनाली लांडगे, पंकज कोद्रे, विकी माने, अभिजित बोराटे, आनंद गोयल, मिलिंद अहिरे, दत्ता खवळे यांसह महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेनेचे पुणे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यापूर्व कामे पूर्ण करण्यात झालेल्या हलगर्जीपणाविरोधात आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

 

 

Web Title: Pune floods in first rain shiv sena launches aggressive halla bol protest against pmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • floods
  • Pune Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
1

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
2

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
3

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.