
Diwali 2026
धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती लक्षात घेत महापालिकेने प्रत्येक गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन आठवड्यांपासून त्याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात पुणेकरांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी दिवाळीच्या काळात पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.
Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?
महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून पाण्याअभावी हाल होणार नाहीत, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. ‘दिवाळी सण तोंडावर असून, या पार्श्वभूमीवर घरांची स्वच्छता, फराळाची तयारी, पाहुण्यांची वर्दळ आणि इतर कारणांमुळे पाण्याची मागणी वाढते. अशा परिस्थितीत गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे दिवाळीच्या काळात गुरुवारची पाणीकपात तात्पुरती रद्द करण्यात आली आहे,’ असे महापालिकेने म्हटले आहे.
विरोधी पक्षात असताना पाणी कपातीच्या विरोधात आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते सध्या पुण्याच्या पाणी कपातीच्या निर्णयावर गप्प बसले आहेत. जलसंपदा विभागाने शहराची गरज लक्षात न घेता, पाण्याचा कोटा कमी केला आहे. जनप्रतिनिधींनी पुणेकरांची बाजू न मांडल्याने आता एक दिवस आड पाणी पुरवठा शहराला होणार आहे.
पाणी पुरवठ्यावरून जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात सातत्याने वाद निर्माण होत आहे. खडकवासला धरण साखळीतून पुणे शहराला किती टीएमसी पाण्याचा पुरवठा करावा, गरज किती, त्यापोटी महापालिकेकडून जलसंपदा विभागाला कोट्यवधी रुपयांची येणी बाकी असे अनेक मुद्द्यांवर वाद होत आहेत. राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. खडकवासला धरण साखळीत पुरेसा जलसाठा असतानाही पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे.
Ans: पुण्यात दर आठवड्यात गुरुवारी पाणी कपात करण्यात येत होती.
Ans: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गुरुवारी केली जाणारी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.