Photo Credit- Team Navrashtra 'बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए' म्हणत पुण्यातून कुणाल कामराला जशास तसे उत्तर
पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कामराच्याच शैलीत काव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक टिळक रस्त्यावर झळकला आहे. रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ असे व्यंगचित्र असलेला हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए !’ अशा शब्दांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला आहे.
युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकुर डायनिंग हॉलसमोर लावला आहे. ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ गाण्यांच्या ओळी लिहीत ‘शेर नजर वो आए’ असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला. हिंदुत्वाचा कैवारी, चिपळूणचा महापूर, इर्शाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते, असे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे.
Jaykumar Gore News: ‘महिलेच्या आडून मला संपवण्याचा कट…’; जयकुमार गोरेंच्या दाव्याने
एका कार्यक्रमात विनोदी कलाकार कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. या गाण्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले दोन गट यावर भाष्य करण्यात आलं होतं.
4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा पृष्ठभाग कसा होता? थरथरणाऱ्या पृथ्वीने उघड केली गूढ रहस्ये
गाण्यात तो म्हणतो, “आधी शिवसेना भाजपमधून बाहेर आली, मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. एका मतदाराला 9 पर्याय दिले गेले, त्यामुळे सगळे गोंधळले.”या गाण्यातील ओळी – ‘ठाणे की रिक्षा, चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा… मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये…’ – अशा असून त्यात एकनाथ शिंदे यांचं नाव थेट घेतलेलं नसलं, तरी संकेत स्पष्टपणे त्यांच्याकडे आहे