Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात दोन वर्षांत धावल्या अवघ्या १७ ‘पिंक ई-ऑटो’; अनुदान दुप्पट, मात्र…

नव्या शासन निर्णयानुसार, यापूर्वी ‘पिंक ई-ऑटो’चा लाभ घेतलेल्या महिलांनाही अतिरिक्त २० टक्के अनुदान मिळणार आहे. लाभार्थींना वाहनाच्या किमतीपैकी किमान १० टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 02:35 AM
पुण्यात दोन वर्षांत धावल्या अवघ्या १७ ‘पिंक ई-ऑटो’; अनुदान दुप्पट, मात्र…
Follow Us
Follow Us:
  • पुण्यात दोन वर्षांत धावल्या अवघ्या १७ ‘पिंक ई-ऑटो’
  • अनुदान दुप्पट; मात्र उद्दिष्टात कपात
  • प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणांची मागणी
पुणे/सुनयना सोनवणे: महिलांना स्वावलंबी बनविणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘पिंक ई-ऑटो’ योजनेची पुण्यातील अंमलबजावणी अत्यंत संथ असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यासाठी चार हजार लाभार्थींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असतानाही योजना सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी केवळ १७ महिलांनीच अर्ज प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिलांना मिळणारे अनुदान २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविले असले, तरी राज्यातील लाभार्थ्यांचे उद्दिष्ट १० हजारांवरून पाच हजारांपर्यंत कमी केले आहे.

जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला पुणे शहरासाठी १,४००, पिंपरीसाठी ३०० आणि चिंचवडसाठी ३०० लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी हे उद्दिष्ट वाढवून चार हजार करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने सुधारित निर्णय घेत लाभार्थ्यांच्या संख्येत कपात केली आहे.

नव्या शासन निर्णयानुसार, यापूर्वी ‘पिंक ई-ऑटो’चा लाभ घेतलेल्या महिलांनाही अतिरिक्त २० टक्के अनुदान मिळणार आहे. लाभार्थींना वाहनाच्या किमतीपैकी किमान १० टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार असून, उर्वरित रक्कम बँक कर्ज किंवा व्याजमुक्त स्थगित देयक सुविधेद्वारे उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, ‘परिसर’ आणि ‘असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायझर्स’ यांनी केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणात अर्ज प्रक्रियेतील गुंतागुंत, कर्ज मंजुरीतील विलंब, स्वतःचा आर्थिक वाटा उभारण्याची अडचण आणि शाश्वत उत्पन्नाबाबतची अनिश्चितता हे योजनेच्या अंमलबजावणीतील प्रमुख अडथळे असल्याचे निदर्शनास आले आहे.

Pink Rickshaw Scheme : पिंक रिक्षा ठरतेय चर्चेचे कारण; ‘ग्रीन कॅनेटी’ कंपनीच्या शोरूमवर…

संस्थांच्या प्रमुख शिफारसी 
– अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करून जिल्हास्तरावर तक्रार निवारण यंत्रणा उभारावी.
– महिलांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी मार्ग नियोजन व परवान्यांची प्रक्रिया गतिमान करावी.
– वाहनांच्या तांत्रिक क्षमतेचा पुनर्विचार करून देखभाल व दुरुस्तीसाठी सुलभ तांत्रिक मदत उपलब्ध करावी.
– मेट्रो स्थानके आणि प्रमुख गर्दीच्या ठिकाणी ‘पिंक ई-ऑटो’साठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी.

‘अनुदानातील वाढ हा निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र, योजनेची व्यापक जनजागृती, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि संबंधित यंत्रणांकडून वेळेत सहकार्य मिळणे तितकेच आवश्यक आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंग, रिक्षा उभी करण्यासाठी निश्चित जागा तसेच आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे सहकार्य मिळाल्यास अधिक महिला या व्यवसायाकडे वळू शकतील.’
– शर्मिला देव, वरिष्ठ कार्यक्रम सहयोगी, परिसर

पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा, अनेक महिलांची फसवणूक; बाबा कांबळेंचा आरोप

‘स्वतःची रिक्षा चालवल्याने महिलांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन वाढले असून, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वाहनांच्या देखभालीसाठी तांत्रिक मदत, निश्चित पार्किंग, परवाने, मार्ग नियोजन आणि नियमित उत्पन्नाची खात्री यांसारख्या बाबींवरही तितक्याच गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.’
– विलास गिते, कार्यक्रम सहयोगी, असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायझर्स

Web Title: 1299543implementation of pink e auto scheme in pune is very slow maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Maharashtra Govenment
  • pune news
  • Womens

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.