
PMC Election: 86 लाख रोकड, १२ लाखांची दारू अन्...; आचारसंहिता भंगाच्या तब्बल 'इतक्या' तक्रारी
१२ लाखाची दारू व २७ लाखाचे अंमलीपदार्थ जप्त
निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या ८५ तक्रारी
तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल
पुणे: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून निकाल लागेपर्यंत आचारसंहिता भंगाच्या ८५ तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून चौकशीमध्ये तथ्य आढळलेल्या ११ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय निवडणुकीच्या काळात ८६ लाखांची रोकड, २६ लाख ८४ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ आणि १२ लाखाची साडेआठ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
गेली पावणे चार वर्ष महापालिकेमध्ये प्रशासन राज होते. न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीचा आचारसंहिता १५ डिसेंबर २०२५ रोजी लागू झाली होती. ही आचारसंहिता महापालिकेचे मतदान झाल्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी संपुस्टात आली. आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग करू, नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आचारसंहितेचा भंग केल्यानंतर होणाऱ्या परिणामांची माहितीही देण्यात आली.
Model Code of Conduct: काय असते आदर्श आचारसंहिता, काय आहेत नियम अन् कधी लागू होते?
मात्र, त्यानंतरही राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू झाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत एकूण ८५ तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. प्रप्त तक्रारींची चौकशी करण्यात आली असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या ११ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिस प्रशासनाने आचारसंहितेच्या काळात ८६ लाख १ हजार ४८० रुपयाची रोकड जप्त केली आहे. तसेच आणि १२ लाखाची साडेआठ लाख लिटर दारू जप्त केली आहे.
आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेच्या काळात नेमके काय करावे आणि काय करु नये ?
आचारसंहितेच्या काळात प्रशासनाने केलेली कारवाई
– ८५ तक्रारी दाखल
– ११ जणांवर गुन्हे दाखल
– ८६ लाख १ हजार ४८० रुपयाची रोकड जप्त
– २६ लाख ८४ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
– १२ लाखाची साडेआठ लाख लिटर दारू जप्त