Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

मावळ तालुक्यातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांमध्ये सुमारे १,१०० एकर क्षेत्रावर नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत विकसित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 02:29 PM
तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर...

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर...

Follow Us
Follow Us:

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मावळ तालुक्यातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांमध्ये सुमारे १,१०० एकर क्षेत्रावर नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत विकसित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. प्रस्तावित क्षेत्राचे प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून, जमिनीच्या दरनिश्चितीला राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी बऊर येथे सुमारे ८७ हेक्टर, करंज येथे १३५ हेक्टर आणि ब्राह्मणवाडी येथे १८३ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. या तिन्ही गावांमधील जमिनींचे प्राथमिक सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीकडून भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर जमिनीच्या दरनिश्चितीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दरनिश्चितीला शासनाची मंजुरी मिळताच भूसंपादनाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रक्रिया वेगाने पूर्ण करून नवीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

चाकणवरील ताण कमी होणार

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासह प्रमुख महामार्गांच्या जवळ प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. चाकण एमआयडीसीमध्ये वाढती वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांवरील वाढता ताण आणि औद्योगिक विस्तारासाठी उपलब्ध जागेची कमतरता या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात उद्योगांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नव्या एमआयडीसीमुळे चाकण औद्योगिक पट्ट्यावरील पायाभूत सुविधा आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नवीन उद्योग, गुंतवणूक आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा : चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

पाबळमध्येही एमआयडीसीचा प्रस्ताव

दरम्यान, शिरूर तालुक्यातील पाबळ येथेही सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर नवीन एमआयडीसी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित क्षेत्राची जमिनीची मोजणी लवकरच करण्यात येणार असून, त्यानंतर भूसंपादनासह पुढील प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. मावळ आणि शिरूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या या औद्योगिक क्षेत्रांमुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विस्ताराला नवी दिशा मिळण्याबरोबरच चाकण औद्योगिक परिसरावरील वाढता ताण कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

Web Title: A new midc is set to come up near talegaon in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
1

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
2

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश
3

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
4

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.