शिक्रापूर : युक्रेन व रशिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य स्थितीमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी तेथे अडकल्याची स्थिती निर्माण झालेली असताना पुणे जिल्ह्यातील देखील काही विद्यार्थी तेथे अडकले असून, शिरुर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग असल्याने सदर विद्यार्थ्यांचे पालक चिंता व्यक्त करत आहेत.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) गावातील मयूर मांदळे व कोमल अवगुणे हे दोघे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी युक्रेन देशामध्ये गेलेले आहेत. सदर विद्यार्थ्यांसोबत पुणे जिल्ह्यातील देखील काही विद्यार्थी गेलेले आहे. सध्या तसेच त्यांच्या सोबत असलेले काही पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेन देशामध्ये शिक्षणासाठी गेलेले आहे, युक्रेन व रशिया या देशामाध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मयूर मांदळे व कोमल अवगुणे यांनी शिरुर आंबेगाव युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप यांना फोन करून माहिती देत तेथील सर्व परिस्थिती सांगित आम्हाला काहीतरी मदत करा अशी मागणी केली.
दरम्यान, अमोल जगताप अमोल जगताप यांनी तातडीने शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधत सर्व माहिती त्यांना सांगितली त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगेचच सर्व विद्यार्थ्यांची माहिती घेत भारताचे परराष्ट्र मंत्री व युक्रेन देशात असलेले राजदूत यांच्याशी मेलद्वारे पत्रव्यवहार करुन पुणे जिल्ह्यातील अजूनही काही विद्यार्थ्यांची यादी देत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत पाठविण्यासाठी तसेच त्यांना योग्य ती मदत करण्याची मागणी केली आहे. पालक चिंतेत असून मुलांची वाट पाहत आहेत.
हिवरे येथील दोन मुले युक्रेनमध्ये अडकलेले असून त्यांनी माझ्याशी संपर्क केला असून मी खासदार डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून मदतीसाठी प्रयत्नशील आहे, मात्र मुलांचा त्यांच्या पालकांशी संपर्क होत नसल्याने त्यांचे पालक चिंतेत आले असल्याचे शिरुर आंबेगाव युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप यांनी सांगितले.