ओमाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 104 धावांचे लक्ष्य (फोटो-सोशल मीडिया)
ZIM vs OMA, ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज कोलंबो सिंहली स्पोर्ट्स क्लब स्टेडीयमवर बी गटातील झिम्बाब्वे आणि ओमान यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या ओमान संघ प्रथम फलंदाजी करत १९.३ षटकातच १०३ धावांवर गारद झाला आहे. ओमानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेची गोलंदाजांसमोर नांगी टाकली. झिम्बाब्वेच्या संघाला विजयासाठी १०४ धावांचे लक्षय देण्यात आले आहे. ब्लेसिंग मुजरबानीमे ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी
या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. संघाची सुरुवात वाईट झाली. २७ धावांवर ओमान संघाचा अर्धा संघ माघारी गेला होता. ७ षटकात संघाने ५ विकेट्स गमावल्या. आमिर कलीम ५ धावा, कर्णधार जतिंदर सिंग ५ धावा, हम्माद मिर्झा आणि वसीम अली या दोघांना भोपळा ही फोडता आला नाही. तर वसिम अली ३ धावा काढून बाद झाले. त्यानंतर विनायक शुक्ला आणि सुफियान मेहमूद यांनी थोडा फार प्रतिकार करून संघाला सवरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ४२ धावांची भागीदारी केली. विनायक शुक्ला २८ धावा करून बाद झाला तर सुफियान मेहमूद २५ धावांवर माघारी गेला. त्यानंतर जितेन रामानंदी १ धावा, नदीम खान २० धावा, शकील अहमद ४ धावा करून बाद झाले तर शाह फैसल ५ धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वे कडून रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुजरबानी आणि ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर सिकंदर रझाने १ विकेट घेतली. झिम्बाब्वेला विजयासाठी १०४ धावा कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा : IND VS PAK : “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया
झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी, डायोन मायर्स, ब्रेंडन टेलर(विकेटकीपर), सिकंदर रझा(कर्णधार), रायन बर्ल, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुजरबानी ब्रॅड इव्हान्स,
ओमान प्लेइंग इलेव्हन: जतिंदर सिंग(कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, जितेन रामानंदी, विनायक शुक्ला(विकेटकीपर), सुफियान मेहमूद, नदीम खान, शाह फैसल, शकील अहमद






