Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Pune Protest: ‘…दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार’; पुण्यातून अभिजीत दिपकेंचा इशारा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉक्रोज जनता पर्टीचे आंदोलन झाले त्यावेळी सोनम वांगचुक, विद्यापीठातील आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी, ऑड. असिम सरोदे, नितीन अंधळे, राहुल डंबाळे आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 09:27 PM
CJP Pune Protest: '...दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार'; पुण्यातून अभिजीत दिपकेंचा इशारा

CJP Pune Protest: '...दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार'; पुण्यातून अभिजीत दिपकेंचा इशारा

Follow Us
Follow Us:

शिक्षणमत्र्यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतर
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले
आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण

पुणे:
परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्था, पेपरफुटी, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील अडचणी याविरोधात विद्यार्थ्यांनी आता रस्त्यावर उतरून आवाज उठविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच शुक्रवारपर्यंत राजीनामा न झाल्यास २० जून रोजी दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन झाले त्यावेळी सोनम वांगचुक, विद्यापीठातील आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी, ऑड. असिम सरोदे, नितीन अंधळे, राहुल डंबाळे आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

दिपके म्हणाले, पेपरफुटीच्या घटनांवर बोलताना “पेपर फुटले, मात्र कोणीही राजीनामा द्यायला तयार नाही. देशातील एक कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे की एका मंत्र्याचे पद?” असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच परीक्षा आणि भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला.

सोनम वांगचुक म्हणाले, पुण्याचे पर्यावरण संवर्धनातील सहभागाचे कौतुक करताना त्यांनी शहरातील नदी संवर्धन, वृक्ष संरक्षण आणि पर्यावरणाशी संबंधित विविध जनआंदोलनांचा उल्लेख केला. पुणे आणि महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये सामाजिक प्रश्नांबाबत असलेली जागरूकता आशादायक आहे. शिक्षण व्यवस्थेतील आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी सत्याच्या मार्गाने संघर्ष करण्याची गरज आहे.

CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती कॉकरोचेस सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा

‘पंचसूत्री’ दिपक च्या मागण्या

आंदोलनकर्त्यांनी जाहीर केलेल्या ‘पंचसूत्री’ मागण्यांमध्ये पेपरफुटी झाल्यास विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची भरपाई, परीक्षा पुढे ढकलल्यास नुकसानभरपाई, निकाल उशिरा लागल्यास प्रतिमहिना आर्थिक मदत, भरती प्रक्रियेदरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था, ७२ तासांच्या आत पर्यायी परीक्षेची तारीख जाहीर करणे, उत्तरपत्रिका प्रत्यक्ष तपासणी, वयोमर्यादेत सवलत आणि परीक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट आदी मागण्यांचा समावेश अभिजीत दिपके यांनी केला.

संविधानाच्या बाजूने उभे राहणारे लोक अराजक कसे

मुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्त्यांना ‘अराजक तत्त्वे’ संबोधल्याच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया देण्यात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणारे आणि संविधानाच्या बाजूने उभे राहणारे लोक अराजकवादी कसे असू शकतात?” असा प्रश्न दिपके यांनी उपस्थित केला.

जय भीमच्या घोषणा देणे, आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालणे हि अराजकता आहे का? फडणवीसांच्या टीकेवर CJP च्या अभिजित दीपकेंचा पलटवार

विद्यापीठ आंदोलनमय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टी (CJP)च्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके यांनी केले. विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले. विद्यापीठ प्रशासनाने काही अटी व शर्तींसह आंदोलनास परवानगी दिली होती. आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी “नरेंद्र मोदी उत्तर द्या”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली होती.

Web Title: Abhijeet dipke warn to modi govet dharmendra pradhan resign eet paper leak pune protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • pune news
  • Pune University

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
1

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर
2

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
3

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
4

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.