फोटो सौजन्य सोशल मीडिया
Pune Crime News: पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! ‘आमराई रिसॉर्ट’मधील देहव्यापार रॅकेट उद्ध्वस्त
पेन्सिल चौक परिसरात काही जण एकमेकांशी वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही जण सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी भांडण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधितांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शाहरुख शकिल शेख यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गणेश शरद आटोळे, विनोद विठ्ठल आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे यांच्यासह एकूण १६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व १६ जण सावळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील रहिवासी असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार टिळेकर यांनी दाखल अंमलदार म्हणून काम पाहिले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप काळे करीत असून, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९४ हे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या भांडणांशी संबंधित आहे. दोन किंवा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्यास त्याला ‘Affray’ म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी शांतताभंग करणारे भांडण मानले जाते. या कलमाच्या उपकलम (२) नुसार दोषी आढळल्यास एक महिन्यापर्यंत कारावास, एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.






