Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा

शहराची वाढती लोकसंख्या, वाढती पाण्याची मागणी आणि पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 11:31 AM
पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात पाणी प्रश्न गंभीर बनताना दिसत आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, आषाढी वारीनिमित्त पुणे महापालिका प्रशासनाने ही पाणी कपात मागे घेतली होती. पण, आता शहरातील पाणीसाठ्याची स्थिती आणि खडकवासला धरणसाखळीतील अपेक्षेपेक्षा कमी झालेली पाण्याची आवक लक्षात घेता पुणे महापालिकेने १५ जुलैपासून शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी ही माहिती दिली. पावसाळा सुरू होऊनही धरणक्षेत्रात सातत्याने समाधानकारक पाऊस होत नसल्याने आणि पुढील काही महिन्यांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने यापूर्वी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल होणार असल्याने त्यांना पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. तसेच शहरातील नागरिकांनाही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. त्या काळात महापालिकेने वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, पावसाचा हंगाम अद्याप संपलेला नसला तरी केवळ पुढील पावसाच्या अंदाजावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. शहराची वाढती लोकसंख्या, वाढती पाण्याची मागणी आणि पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्यास परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक ते बदल केले जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

क्षेत्रनिहाय वेळापत्रक लवकरच जाहीर

दिवसाआड पाणीपुरवठा लागू झाल्यानंतर शहरातील प्रत्येक भागाला एक दिवसाआड पाणी मिळणार असून त्यासाठी क्षेत्रनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील वेळापत्रकाची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय, महापालिकेच्या अधिकृत माध्यमांद्वारे किंवा स्थानिक प्रशासनाकडून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी साठवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी, आवश्यक तेवढेच पाणी भरून ठेवावे आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार ! ग्रांट रोड क्लस्टर प्रकल्पाची एसआयटी चौकशी करा; मच्छीमार कृती समितीची मागणी

Web Title: Alternate day water supply in pune resumes from july 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • pune news
  • Water Issue
  • Water supply

संबंधित बातम्या

डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी
1

डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी

Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य
2

Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
3

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
4

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.