सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: विधानपरिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे. फुरसूंगी येथे ही घटना घडली आहे. फूरसूंगी येथील द्वारकाधीश गोशाळेजवळ सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबद्दल एक विधान केले होते. त्यानंतर आक्रमक होत गोरक्षकांनी खोत यांना धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.
आमदार रोहित पवारांचा सोशल मिडियावर ट्वीट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. रोहित पवारांची पोस्ट नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात.
पुण्यात तथाकथित गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा जाहीर निषेध! राजकीय मतभेद असले तरी त्यांनी मांडलेली भूमिका सर्वसामान्यांच्या हिताची असेल तर त्याचं समर्थनच केलं पाहिजे. सदाभाऊ खोत यांनी मांडलेली भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची होती.
पुण्यात तथाकथित गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा जाहीर निषेध! राजकीय मतभेद असले तरी त्यांनी मांडलेली भूमिका सर्वसामान्यांच्या हिताची असेल तर त्याचं समर्थनच केलं पाहिजे.
सदाभाऊ खोत यांनी मांडलेली भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2025
कारण मागच्या काही काळात गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करत शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या तथाकथित गोरक्षकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सरकारने सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करून तथाकथित गोरक्षकांच्या मुसक्या आवळाव्या, ही विनंती!
नेमके काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी गोरक्षकांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका गाडीला अडवले होते. त्यानंतर वाहनाच्या चालकाला देखील मारहाण करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यांनंतर पोलिसांनी सबंधित जनावरे ताब्यात घेऊन त्या जनावरांना गोशाळेत ठेवले होते. दरम्यान कोर्टाने जनावरे परत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही जनावरे गोशाळेत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यावेळेस सदाभाऊ खोत हे त्याची पाहणी करायला गेले असताना तयांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचे दिसून येत आहे. पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट झाल्याचे समजते आहे. पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याने हा वाद निर्माण झाल्याचे समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ही घटना घडली आहे. हाके आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.