Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात निवडणुकीत अंधश्रद्धेचा खेळ! उतारे, जादूटोणा, करणीच्या अफवांनी ग्रामीण मतदार भयग्रस्त

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच लोकशाहीच्या उत्सवावर अंधश्रद्धेची काळी छाया पडताना दिसत आहे. ग्रामीण समाजमनात अशा गोष्टींबाबत भीती आणि गैरसमज रुजलेले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2026 | 06:56 PM
Attempts to cast black magic in Zilla Parishad and Panchayat Samiti elections in pune

Attempts to cast black magic in Zilla Parishad and Panchayat Samiti elections in pune

Follow Us
Follow Us:

Pune Political News : पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच लोकशाहीच्या उत्सवावर अंधश्रद्धेची काळी छाया पडताना दिसत आहे. प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप यांच्या पलीकडे जाऊन आता ग्रामीण भागात उतारे, जादूटोणा, करणी, काळी जादू अशा प्रकारांमुळे भीती आणि संशयाचे वातावरण तयार होत आहे. भोर तालुक्यात घडलेला प्रकार हा केवळ एक उदाहरण असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अशाच घटना सातत्याने घडत असल्याची चर्चा आहे.

ग्रामीण भागातील गावोगावी मध्यरात्री घरांसमोर, चौकात किंवा रस्त्यांच्या कडेला लिंबू, बिबवे, गुलाल, बुक्का, हळद-कुंकू, करडई आदी साहित्य ठेवलेले ‘उतारे’ आढळून येत आहेत. सकाळी नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच गावांमध्ये खळबळ उडते. आजही ग्रामीण समाजमनात अशा गोष्टींबाबत भीती आणि गैरसमज खोलवर रुजलेले असल्याने अनेक कुटुंबे मानसिक दबावाखाली येत आहेत.

हे देखील वाचा : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं

मतांसाठी भीतीचे राजकारण?

हे प्रकार निवडणूक आचारसंहितेच्या काळात घडत असल्याने त्यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. थेट प्रचार न करता मतदारांच्या मनात भीती निर्माण करून त्यांचे मानसिक वशीकरण करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. काही भागांत ‘विरोधकांना मानसिक धक्का देण्यासाठी’ किंवा ‘गावात संभ्रम पसरवण्यासाठी’ हे प्रकार मुद्दाम घडवले जात असल्याची चर्चा आहे.

पुणे जिल्ह्याचा ग्रामीण पट्टा सामाजिकदृष्ट्या प्रगत मानला जात असला, तरी निवडणुकीच्या काळात अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांचे पुनरागमन होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. काही गावांमध्ये तरुणांनी पुढाकार घेऊन हे उतारे काढून टाकले असले, तरी भीतीचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही.

हे देखील वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेणं टाळलं! पण अर्थमंत्री सीतारमण यांनी 24 वेळा केला टॅरिफचा उल्लेख

अंधश्रद्धेला थारा नको – तज्ज्ञांचा इशारा

या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चिंता व्यक्त केली आहे. राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण बुरांडे यांनी ग्रामस्थांना घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट केले. “लिंबू, बिबवे, उतारे यामुळे कोणतेही अमंगल होत नाही. निवडणुकीच्या काळात लोकांच्या भावना भडकवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. नागरिकांनी विवेक सोडू नये,” असे त्यांनी सांगितले.

प्रशासन गप्प का?
धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील अनेक भागांत असे प्रकार घडूनही बहुतांश ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. भीती, बदनामीची धास्ती आणि अंधश्रद्धेमुळे नागरिक गप्प राहतात. मात्र, या शांततेचा फायदा घेत अंधश्रद्धेचे राजकारण अधिक बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. मात्र, या उत्सवात जर भीती, संशय आणि अंधश्रद्धेचा वापर होऊ लागला, तर त्याचा थेट परिणाम मतदानावर आणि लोकशाहीच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि सामाजिक संघटनांनी वेळीच हस्तक्षेप करून या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Attempts to cast black magic in zilla parishad and panchayat samiti elections in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Black magic
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.