Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

“संग्रहालयांचे शहर” अशी ओळख असलेल्या पुण्यात आता संग्रहालयांविषयी नागरिकांमध्ये नव्याने जागरूकता वाढताना दिसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 18, 2026 | 04:03 PM
पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/ गायत्री पवळे : “संग्रहालयांचे शहर” अशी ओळख असलेल्या पुण्यात आता संग्रहालयांविषयी नागरिकांमध्ये नव्याने जागरूकता वाढताना दिसत आहे. मेट्रो, आयटी पार्क, मॉल संस्कृती आणि वेगवान शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा इतिहास, संस्कृती आणि वारसा जपणाऱ्या संग्रहालयांकडे तरुण पिढी पुन्हा आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. फ्लेम विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या “म्युझीयम अँड हेरिटेज साइट— द मिसिंग लिंक इन स्मार्ट सिटी प्लानिंग :अ केस स्टडी ऑफ पुणे सिटी ” या अभ्यासात पुण्याच्या स्मार्ट सिटी विकास आराखड्यात संग्रहालये आणि वारसा स्थळांकडे तुलनेने कमी लक्ष दिले जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. शहराच्या विकासात तांत्रिक आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य मिळत असताना सांस्कृतिक वारशाला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज या संशोधनातून अधोरेखित करण्यात आली होती.

 

संशोधनात पुण्यातील संग्रहालये ही शहराची “सामाजिक-सांस्कृतिक पायाभूत रचना” असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अभ्यासात अनेक संग्रहालये आणि वारसा स्थळे मुख्य वाहतूक व्यवस्थेपासून दूर राहत असल्याचे दिसून आले होते. तरीही गेल्या काही वर्षांत पुण्यात संग्रहालयांविषयी सकारात्मक वातावरण तयार होताना दिसत आहे.

राजा दिनकर केळकर संग्रहालय, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम, जोशी रेल्वे संग्रहालय आणि दार्शन संग्रहालय यांसारख्या संग्रहालयांमध्ये विद्यार्थ्यांची, पर्यटकांची आणि तरुणांची उपस्थिती वाढताना दिसत आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडियामुळे “हिडन म्युझियम्स ऑफ पुणे”, “हेरिटेज वॉक” आणि “कल्चरल ट्रेल्स” यांसारख्या संकल्पना लोकप्रिय होत आहेत. अनेक तरुण इंस्टाग्राम रील्स , फोटोग्राफी टूर्स आणि हेरिटेज कंटेंट च्या माध्यमातून पुण्याचा इतिहास नव्या पद्धतीने अनुभवत आहेत. काही संग्रहालयांनी डिजिटल डिस्प्ले, ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणे आणि इंटरअॅक्टिव्ह अनुभव सुरू केल्याने नवीन पिढीचा सहभाग वाढत आहे.

स्मार्ट सिटी म्हणजे केवळ डिजिटल आणि आधुनिक सुविधा नव्हे, तर शहराच्या सांस्कृतिक स्मृती जपणारी व्यवस्था देखील आहे. पुण्यातील संग्रहालये ही केवळ ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन नसून शहराची ओळख, परंपरा आणि सामाजिक इतिहास जपणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक संवर्धनालाही समान महत्त्व देण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध संग्रहालये

राजा दिनकर केळकर संग्रहालय
महात्मा फुले संग्रहालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक
जोशीज म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज
झपुर्झा म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चर
दर्शन म्युझियम
श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

“माणसाच्या हजारो वर्षांच्या प्रगतीचा, तिथल्या चांगल्या-वाईट स्मृतींचा, सृजनतेचा आणि सौंदर्याचा खरा ठेवा म्हणजे संग्रहालय होय. आपण समाज म्हणून कसे घडलो? हे प्रत्यक्ष पाहण्याची आणि अनुभवण्याची भूतकाळाची खिडकी म्हणजेच संग्रहालये आहेत. लहान मुलांच्या सर्वांगीण बौद्धिक शिक्षणासाठी आणि भूतकाळातून शहाणपण शिकण्यासाठी पालकांनी ही संग्रहालये मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत.” — गणेश खुटवड, (इतिहास अभ्यासक)

कमी प्रसिद्ध संग्रहालये

ट्रायबल कल्चरल म्युझियम
आर. के. लक्ष्मण संग्रहालय
पेशवे संग्रहालय
नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड

“जर इतिहास शिकवणारे शिक्षक उत्तम आणि कल्पक असतील, तर मुले स्वतःहून वस्तू संग्रहालयांकडे आकर्षित होतील. महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक संग्रहालये पुण्यातच आहेत. तसेच पुण्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या ‘हेरिटेज वॉक’मुळे संग्रहालयांना आता खऱ्या अर्थाने चांगले दिवस आले आहेत.” — प्रा. गणेश राऊत, (इतिहास विभाग, एच. व्ही. देसाई कॉलेज, पुणे)

हे सुद्धा वाचा : रिक्षाच्या मागे पोस्टर्स, मुंबईच्या रस्त्यांवर धावपळ! सुपरस्टार Aamir Khanचा 1988 सालचा ‘तो’ VIDEO VIRAL;पाहून नेटकरी भावूक

 

Web Title: Awareness about museums is growing among youth in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • History
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
1

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
2

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
3

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
4

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.