Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election : पुण्यात सकाळच्या वेळी संथ गतीने मतदान; साडेअकरापर्यंत 14.92 टक्क्यांची नोंद

सकाळच्या सत्रात अपेक्षेइतका उत्साह दिसून आला नसला, तरी साडेअकरा वाजेपर्यंत पुणे शहरात एकूण १४.९२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2026 | 01:56 PM
पुण्यात सकाळच्या वेळी संथ गतीने मतदान; साडेअकरापर्यंत 14.92 टक्क्यांची नोंद

पुण्यात सकाळच्या वेळी संथ गतीने मतदान; साडेअकरापर्यंत 14.92 टक्क्यांची नोंद

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात सकाळच्या वेळी संथ गतीने मतदान
  • साडेअकरापर्यंत 14.92 टक्क्यांची नोंद
  • सकाळच्या सत्रात अपेक्षेइतका उत्साह कमी
पुणे/आकाश ढुमेपाटील : महानगरपालिकेची बहुप्रतिक्षित निवडणूक आज शांततेत पार पडत असून, सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात अपेक्षेइतका उत्साह दिसून आला नसला, तरी साडेअकरा वाजेपर्यंत शहरात एकूण १४.९२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या कालावधीत एकूण पाच लाख २९ हजार ९३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय तफावत पाहायला मिळत आहे. सर्वाधिक मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना–हॅपी कॉलनी परिसरात नोंदवली गेली आहे. सकाळपासूनच या भागात मतदारांची चांगलीच वर्दळ पाहायला मिळाली. सुशिक्षित मध्यमवर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र होते.

सर्वात कमी मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर–आंबेगाव–कात्रज परिसरात नोंदवली गेली असून, येथे साडेअकरा वाजेपर्यंत केवळ ९.८८ टक्के मतदान झाले आहे. या भागात सकाळी उशिरा सुरू होणारी हालचाल, कामगार वर्गाची उपस्थिती तसेच काही ठिकाणी मतदारांमधील उदासीनता याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

महिला मतदारांच्या सहभागाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. सुस–बाणेर–पाषाण प्रभागामध्ये सर्वाधिक ११ हजार ६५२ महिलांनी साडेअकरा वाजेपर्यंत मतदान केले आहे. विशेष म्हणजे याच प्रभागात पुरुष मतदारांचाही उत्साह दिसून आला असून १६ हजार ३३७ पुरुषांनी मतदान केल्याची नोंद आहे. महिला आणि पुरुष दोन्ही मतदारांचा समतोल सहभाग या प्रभागाची वैशिष्ट्य ठरत आहे.

दुसरीकडे, धनकवडी–कात्रज प्रभागामध्ये महिला मतदारांचा सहभाग सर्वात कमी राहिला आहे. येथे केवळ २ हजार ७८३ महिलांनी मतदान केले असून, पुरुष मतदारांची संख्याही तुलनेने कमी म्हणजेच ३ हजार ८०७ इतकी आहे. या भागात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका आणि निवडणूक प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, पोलिस बंदोबस्त आणि कर्मचारी वर्ग तैनात असून, मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले महत्वाचे आवाहन

राजकीय पक्षांच्या दृष्टीने दुपारनंतरचा आणि संध्याकाळचा मतदानाचा टप्पा निर्णायक मानला जात आहे. सकाळी कमी टक्केवारी नोंदवली असली, तरी दुपारनंतर आणि कामकाज संपल्यानंतर मतदानाचा वेग वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अखेरचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, हे ठरवताना मतदारांचा सहभाग किती वाढतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Citizens are voting today for the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Election News
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीत हालचालींना वेग! अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार?
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीत हालचालींना वेग! अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार?

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
2

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Pune ZP News : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार
3

Pune ZP News : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु
4

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.