सौजन्य - नवराष्ट्र टीम
कसबा बावडा येथील कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिर या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. हे मतदान केंद्र शाहू जन्मस्थळ परिसरात, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारी आहे. मतदानासाठी आमदार पाटील वेळेत मतदान केंद्रावर दाखल झाले होते. यावेळी मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. मतदानानंतर बोलताना आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.
सतेज पाटील म्हणाले, “कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक मत अत्यंत मोलाचे आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा.” दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत आहे.
राम नाईक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. गेल्या अनेक वर्षांपासून राम नाईक नेहमीच मतदानाच्या सुरुवातील वोटिंग करण्यासाठी मतदान केंद्रावर जातात. याबाबत राम नाईक यांनी सांगितलं की, 1960 मध्ये मी गोरेगावमध्ये राहत होतो. तेव्हापासून आतापर्यंत मी प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावत आहे. याचे कारण असे की मी कधी लोकसभा निवडणूक लढवत होतो तर कधी विधानसभा निवडणूक लढवत होतो, त्यामुळे मतदान केंद्रांना भेट देणे आणि तेथील मतदार आणि कार्यकर्त्यांना भेटणे माझ्यासाठी आवश्यक होते. हीच परंपरा आज देखील सुरु आहे.
हे सुद्धा वाचा : “सकाळी 4 वाजता फोन…, भाजपने पैशाचा पाऊस पाडला”, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप






