Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

Dahi Handi: दहीहंडीसाठी लागणाऱ्या आकर्षक मडक्यांचीही बाजारात मागणी वाढली आहे. यंदा मडक्यांच्या दरात सुमारे ५० रुपयांची वाढ झाली आहे. रंग, थिनर आणि सजावटीसाठी लागणाऱ्या खड्यांच्या दरात वाढ झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2026 | 02:35 AM
Dahi Handi Pune

Dahi Handi Pune

Follow Us
Follow Us:
  • मातीच्या मडक्यांपासून मोरपिसाच्या मुकुटापर्यंत बाजारपेठेत पारंपरिक साहित्याला मागणी
  • दहीहंडीच्या मडक्यांच्या दरात ५० रुपयांची वाढ
  • नवजात बालकांचे कृष्णाच्या वेशभूषेत छायाचित्रण करण्याकडे वाढता कल 
पुणे/Dahihandi 2026: हातात मोबाईल, घरात ऑनलाइन गेम्स आणि कार्टूनचे विश्व… अशा डिजिटल युगात वाढणाऱ्या पुण्यातील चिमुकल्यांना मात्र कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बासरी, मोरपिसाचा मुकुट आणि पारंपरिक वेशभूषेचे आकर्षण कायम असल्याचे चित्र आहे. जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये बालकृष्णाच्या सजावटीच्या वस्तू, बासरी, मुकुट, पाळणे आणि मातीच्या मडक्यांची खरेदी सुरू झाली आहे.

नवजात बालकांचे कृष्णाच्या वेशभूषेत छायाचित्रण करण्याचा वाढता कल असल्याने बालकृष्णाच्या पोशाखांना यंदा विशेष मागणी आहे. बाजारात कृष्णाच्या पोशाखांची किंमत २८० ते ३६० रुपयांदरम्यान असून, त्यासोबत बासरी आणि मुकुट दिला जातो. राधेच्या पोशाखांची किंमत १५० ते ४७० रुपयांपर्यंत आहे. फ्री-साइज पोशाख ९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत, अशी माहिती विक्रेते संजय रंका यांनी दिली.

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

भाड्यानेही कृष्ण-राधेचे पोशाख 

जन्माष्टमीसाठी एकदाच वापरल्या जाणाऱ्या पोशाखांऐवजी ते भाड्याने घेण्याकडेही पालकांचा कल आहे. दहा वर्षांखालील मुलांच्या कृष्णाच्या पोशाखाचे एक दिवसाचे भाडे ५५० रुपये, तर दहा वर्षांवरील मुलांसाठी ६५० रुपये आहे. राधेचा पोशाख ५५० रुपयांना भाड्याने मिळतो. केवळ पोशाख घ्यायचा असल्यास ४५० रुपये आकारले जातात, अशी माहिती विक्रेते रितेश कासवाल यांनी दिली.

मडक्यांच्या दरात वाढ

दहीहंडीसाठी लागणाऱ्या आकर्षक मडक्यांचीही बाजारात मागणी वाढली आहे. यंदा मडक्यांच्या दरात सुमारे ५० रुपयांची वाढ झाली आहे. रंग, थिनर आणि सजावटीसाठी लागणाऱ्या खड्यांच्या दरात वाढ झाल्याने मडक्यांच्या किमती वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. बाजारात मडक्यांची सुरुवातीची किंमत सुमारे १०० रुपयांपासून आहे. मडक्याचा आकार, नक्षी आणि सजावटीनुसार किंमत वाढते.

मोबाईलवर पाहतात; पण निवड मात्र स्वतःची 

ऑनलाइन खरेदीचे पर्याय वाढले असले तरी अनेक पालक मुलांना सोबत घेऊन बाजारात येत आहेत. मोबाईलवर कृष्णाचे फोटो पाहणारी मुले प्रत्यक्ष दुकानात बासरी, मुकुट आणि मोरपिस हातात घेऊन त्यांची निवड करत आहेत. त्यामुळे डिजिटल युगातही कृष्णाशी जोडलेल्या पारंपरिक वस्तूंचे आकर्षण कायम असल्याचे विक्रेत्यांचे निरीक्षण आहे.

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस

जन्माष्टमीच्या बाजारातील दर
वस्तू.                                       यंदाची किंमत/भाडे
कृष्णाचा पोशाख.                       ₹२८० ते ₹३६०
राधेचा पोशाख.                            ₹१५० ते ₹४७०
फ्री-साइज पोशाख.                        ₹९०० पासून
कृष्ण पोशाख भाडे (१० वर्षांखालील)    ₹५५०
कृष्ण पोशाख भाडे (१० वर्षांवरील)        ₹६५०
राधेचा पोशाख भाडे.                             ₹५५०
केवळ पोशाख भाडे.                               ₹४५०
दहीहंडीचे मडके.                                 ₹१०० पासून

Web Title: Clay pots to peacock feather crowns demand market traditional items krushna janmashtami and dahihandi 2026 pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • Krishna Janmashtami
  • pune news

संबंधित बातम्या

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती
1

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
2

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
4

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.