Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

बांधकाम विकास प्रस्ताव मंजूर करतानाच महापालिकेकडून एकरकमी अकृषिक रूपांतरण अधिमूल्य आकारले जाणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेतच संबंधित जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित झालेली मानली जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2026 | 02:12 PM
बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिका हद्दीत प्रारूप अथवा अंतिम विकास आराखडा किंवा प्रादेशिक विकास आराखडा लागू असलेल्या परिसरातील शेतजमिनींवर निवासी झोन दर्शविला असेल, तर त्या जमिनीच्या बांधकामासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बिनशेती (एनए) परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अधिनियम, २०२५च्या अनुषंगाने राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अकृषक परवानगी, सनद तसेच अकृषक आकारणीची प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, पुणे महापालिकेने सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यानुसार बांधकाम विकास प्रस्ताव मंजूर करतानाच महापालिकेकडून एकरकमी अकृषिक रूपांतरण अधिमूल्य आकारले जाणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेतच संबंधित जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित झालेली मानली जाणार आहे. परिणामी, बांधकाम परवानगी आणि एनए परवानगीसाठी दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज राहणार नाही.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, बांधकाम विकास शुल्क व इतर शुल्कांसोबत अकृषिक रूपांतरण अधिमूल्य दोन स्वतंत्र चलनांद्वारे भरून घेतले जाणार आहे. या अधिमूल्याच्या एकूण रकमेपैकी ७० टक्के हिस्सा राज्य शासनाचा, तर ३० टक्के हिस्सा महापालिकेचा असेल.

Sangli Politics : सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत

अर्जदाराची जमीन भोगवटादार वर्ग-१ किंवा वर्ग-२ ची असली तरी बांधकाम परवानगीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून वर्ग-२ अथवा भाडेपट्ट्याच्या जमिनीच्या दर्जामध्ये कोणताही बदल होणार नाही. भोगवटादार वर्ग-१ व्यतिरिक्त अन्य जमिनींच्या वापराच्या प्रयोजनात बदल करताना सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन आवश्यक नजराणा किंवा अधिमूल्य भरणे बंधनकारक राहणार आहे. त्याचे पालन न केल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune HCMTR Inner Ring Road : पुण्याच्या ‘HCMTR’ प्रकल्पाला ३० वर्षांनंतर मुहूर्त; भूसंपादनासाठी ३१ ऑगस्टची मुदत

Web Title: Conversion of land to non agricultural na status will take place alongside the grant of construction permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
1

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण
2

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?
3

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?

पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा…; मनसेचे पुणे महापालिका प्रशासनाला निवेदन
4

पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा…; मनसेचे पुणे महापालिका प्रशासनाला निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.