फोटो सौजन्य AI
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसनेरवाडी, येडे वस्ती, लिंगाळी येथे दौंड शुगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका किराणा दुकानाच्या आडोशाला अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी भगवान महादेव येडे (वय ५०) हा देशी व विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून १,७४० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.
Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!
दौंड शहरातील म्हसोबा चाळ, शालिमार चौक परिसरात बंद घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५२ पत्त्यांचा कॅट, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४,५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांकडून पैशांवर रमीचा जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
Pune BJP : भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’
या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस शिपाई पवन शंकर माने आणि गोरख बाबासाहेब हजारे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू विक्रीप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई), तर जुगारप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






