Rajiv Gandhi Zoo News: राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ हरणांचा मृत्यू; विषबाधा की आणखी काही?
Rajiv Gandhi Zoo News: पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात चितळ हरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्यानंतर प्राणीप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पण या प्रकारानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासन सतर्क झाले असून, तातडीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्याची माहिती आहे. संपूर्ण घटनेनंतर चितळ हरणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या त्यांना इतर प्राण्यांपासून पूर्णतः अलिप्त ठेवण्यात आले असून, इतर प्राण्यांशी होणारा कोणताही थेट संपर्क रोखण्यात आला आहे.
तसेच चितळांसाठी स्वतःचा स्वतंत्र अॅनिमल कीपर नेमण्यात आला आहे. या परिसरात कोणालाही सहज प्रवेश दिला जात नाही. सॅनिटायझर व जंतुनाशकांचा वापर केल्यानंतरच खंदकात प्रवेश मिळतो, अन्यथा तो पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. प्राणिसंग्रहालयातील खंदक परिसरात ब्लीचिंग पावडरने निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे.
Uddhav Thackeray News: ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
गेल्या काही दिवसांत १६ चितळ हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने ही धोक्याची घंटा ठरली आहे. संभाव्य साथीच्या आजाराच्या भीतीने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट नसले तरी, विषबाधा अथवा संसर्गजन्य आजाराचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. अधिकृत तपासणी अहवाल येईपर्यंत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय अधिक तीव्र केले आहेत.
7–12 जुलै, 2025 दरम्यान जवळपास 15–16 चितळ मृत्युमुखी पडल्याची बामती उघडकीस आली. यात 14 मादी व 2 नर चितळ हरणांचा समावेश आहे. साथीच्या आजारांवरील (विशेषतः foot‑and‑mouth disease) अथवा खाद्यातून किंवा पाण्यातून विषबाधा झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर, उरलेल्या सर्व चितळांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचीही वैद्यकीय तपासणी सुरू आहे. मृत प्राण्यांचे ऑर्गन आणि रक्ताचे नमुने बरेली, नागपूर, भुवनेश्वर, भोपाळ, पुणे यांसारख्या विविध ठिकाणी असलेल्या नामांकित प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत.
पंड्याचा पुन्हा Heartbreak! आता जास्मिननेही सोडली साथ; दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो.
त्याचबरोबर खाद्य–पाण्याचे नमुने घेतले गेले असून विशिष्ट विषबाधेची तपासणी चालू आहे. संपूर्ण हरणांचे पिंजरे आणि परिसर डिसइन्फेक्ट करण्यात आले आहेत, आणि bio‑security उपाय (जसे की DDT स्प्रे) राबवले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, अद्याप चितळ हरणे वगळता इतर कोणत्याही प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. तसेच 13 जुलैपासून कोणत्याही हरणाचा मृत्यूही झाल्याची नोंद नाही.
लॅब रिपोर्ट्स येत्या दोन ते तीन दिवसांत आल्यानंतरच संक्रमण साथीचा होता की नाही, हे प्रमाणित होईल. ज्या वेळी रिपोर्ट्स येतील त्या वेळी त्या आधारे पुढची उपाययोजना (उपचार, संपूर्ण झूची bio‑security) ठरवली जाणार आहे. स्थानिक वनविभाग, झू प्रशासन आणि PMC यांनी हि तातडीची मोहीम राबवली आहे, आणि संबंधित मंत्री/सभापती यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे.