पुणे गणेश विसर्जन मिरवणूक (फोटो- ट्विटर)
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी
पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन
दगडूशेठ गणपती बाप्पाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर
पुणे: पुणे शहरात विसर्जन मिरवणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. पुण्यातील मानाच्या पहिल्या पाचही गणपतींचे विसर्जन पार पडले आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, दूसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, चौथा मानाचा तुळशीबाग गणपती, मानाचा केसरीवाडा गणपती या पाचही प्रमुख गणपती बाप्पाचे विसर्जन पार पडले.
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीला भाविकांना मोठ्या उत्साहात निरोप दिला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पुणेकरांनी गणरायाला निरोप दिला आहे. पुण्यनगरीत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन पार पडले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्यात पारंपरिक उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.
पुण्यात ठिकठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान श्रीमान दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाली आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा गणनायक रथावर आरुढ झाले आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या गणनायक रथाला सुंदर अशा प्रकारची सजावट करण्यात आली आहे. ढोल तशा, पारंपरिक वाद्यांचा गजर, फुलांची सजावट आणि भक्तांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा जयघोष भविकांकडून केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय
गणेशविसर्जनानिमित्त ६ व ७ सप्टेंबर रोजी पुणे मेट्रो प्रवाशांसाठी एक खास उपक्रम राबवणार आहे. या दोन दिवसांत मेट्रो सेवा सलग ४१ तास अखंड सुरू राहणार आहे. दर सहा मिनिटाला मेट्रो उपलब्ध असेल. हा निर्णय मुख्यतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.सणासुदीच्या काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक सुरक्षित आणि जलद पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…
विशेष म्हणजे, या सेवेत मेट्रो रात्रीसुद्धा उपलब्ध राहील. त्यामुळे मध्यरात्री दर्शनाला जाणारे किंवा उशिरा परतणारे भक्त सहजतेने मेट्रोचा लाभ घेऊ शकतील. मेट्रो प्रशासनाकडून सुरक्षा, स्वच्छता आणि प्रवाशांच्या सोयींसाठी विशेष पावले उचलली गेली आहेत. गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, प्रत्येक स्थानकावर अधिकृत सहाय्यकही तैनात राहतील. तसेच ऑनलाइन तिकीटंही उपलब्ध असेल.