पुणे मेट्रो सलग 41 तास सेवा देणार (फोटो- istockphoto)
विशेष म्हणजे, या सेवेत मेट्रो रात्रीसुद्धा उपलब्ध राहील. त्यामुळे मध्यरात्री दर्शनाला जाणारे किंवा उशिरा परतणारे भक्त सहजतेने मेट्रोचा लाभ घेऊ शकतील. मेट्रो प्रशासनाकडून सुरक्षा, स्वच्छता आणि प्रवाशांच्या सोयींसाठी विशेष पावले उचलली गेली आहेत. गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, प्रत्येक स्थानकावर अधिकृत सहाय्यकही तैनात राहतील. तसेच ऑनलाइन तिकीटंही उपलब्ध असेल.
पुणेकरांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळून नागरिकांना जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल. उत्सवाच्या दिवसांत रस्त्यावरची वाहतूक कमी करून प्रदूषणावरही काही प्रमाणातु नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. पुणे मेट्रोचा हा उपक्रम गणेश भक्तांसाठी तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’
पुणे शहरात मध्यवर्ती भागात कसबा, मंडई आणि स्वारगेट येथे मेट्रो सुरू झाल्याने मोठ्या संख्येने भाविक हे मेट्रोचा प्रवास करत आहेत. दररोज सुमारे दोन लाख मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गणेशोत्सवात वाढ झाली असून, गणेशोत्सवात तब्बल तीन लाखांहून अधिक प्रवासी हे मेट्रोने प्रवास करत आहे, अशी माहिती मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर यांनी दिली. गणेशोत्सवाच्या आधी दररोज सव्वा दोन लाख मेट्रोने प्रवास करत होते. आत्ता ती संख्या वाढली असून, आत्ता गणेशोत्सवात दररोज तब्बल तीन ते सव्वा तीन लाख प्रवासी प्रवास करत आहे.
गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’; दिवसाला तब्बल 3 लाखांहून अधिक भाविक करताहेत प्रवास
पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत आहे. याबाबत मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांभवेकर म्हणाले की, मेट्रो प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियोजन करण्यात आलं असून, दिवसभरात ५५४ फेऱ्या मेट्रोच्या दोन्ही मार्गावर होत होत्या. पण गणेशोत्सवात गणेश भक्तांची वाढती संख्या पाहता मेट्रो दिवसभरात ७४० फेऱ्या पूर्ण करत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रो सेवेचा लाभ घेत आहे’.