Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार...; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला
PCMC Property Tax: पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल
एकत्र ठेवण्याचे आव्हान
विरोधी पक्षांकडूनही या बदललेल्या प्रचारशैलीवर सूचक टीका होत असून, कामाचा वारसा सांगणाऱ्यांनी कामाचे तपशील मांडावेत, अशी अप्रत्यक्ष मागणी पुढे येत आहे. एकूणच, अजित पवाराच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील झाले असले, तरी कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल मतदारांना कितपत पटतो, याचा फैसला अखेर निकालाच्या दिवशीच होणार आहे. ग्रामीण भागात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.
Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप
मात्र, ही प्रचाराची पद्धत खुद्द अजित पवार यांच्या राजकीय विचारधारेच्या विरोधात जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे, भावनिक लाटांवर स्वार होण्याऐवजी विकासकामांची मांडणी, आकडेवारी, निर्णयांची स्पष्टता आणि कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला होता. त्यामुळे त्यांच्या नावावर भावनिक मतदान मागणे हे त्यांच्या राजकीय संस्काराशी विसंगत असल्याची भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे, पुणे जिल्हा हा नेहमीच मुद्देसूद, विचारपूर्वक आणि तुलनात्मक मतदानासाठी ओळखला जातो.
सिंचन, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या मुद्दधांवर आधारित राजकारण येथे प्रभावी ठरले आहे, अशा परिस्थितीत भावनिक आवाहनांवर आधारित प्रचार कितफ्त परिणामकारक ठरेल, याबाबत राजकीय विश्लेषक साशंकता व्यक्त करत आहेत.






