Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई, लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात; दोषींवर कारवाईची मागणी

आंबेगव तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असून, काही ठिकाणी खताचा साठा, उपलब्धता व दर याबाबतची माहिती दर्शविणारे फलकही लावलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 06:16 PM
आंबेगाव तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई, लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात; दोषींवर कारवाईची मागणी

आंबेगाव तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई, लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात; दोषींवर कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:

महाळुंगे पडवळ : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आंबेगाव तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेले युरिया वेळेवर उपलब्ध न झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असून, काही ठिकाणी खताचा साठा, उपलब्धता व दर याबाबतची माहिती दर्शविणारे फलकही लावलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

 

सध्या तालुक्यात मका, आले, टोमॅटो, ऊस तसेच विविध पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. डिंभे धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध असल्याने नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कांदा पिकातील नुकसानीनंतर अनेक शेतकरी पर्यायी पिकांमधून उत्पन्न मिळविण्याच्या आशेवर आहेत. मात्र या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र युरियामधून सुमारे ४६ टक्के प्रमाणात मिळत असल्याने त्याची मागणी वाढली आहे.

दरम्यान, काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध असला तरी ‘लिंकिंग पद्धती’चा अवलंब करून शेतकऱ्यांना इतर खते किंवा कृषी साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याशिवाय अनेक विक्रेते खत विक्रीची पावती देत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यात अडथळे

कृषी विभागाकडे तक्रार करताना खरेदीची बिले सादर करणे आवश्यक असते. मात्र बिलेच न मिळाल्याने शेतकऱ्यांना लेखी तक्रार करणे कठीण जात असून, न्याय मिळविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडले आहेत. काही ठिकाणी युरियाचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्याची चर्चा असून, याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हे सुद्धा वाचा : नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

बफर स्टॉक खुला करण्याचे आश्वासन

या संदर्भात आंबेगाव तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला असता, युरियाचा बफर स्टॉक लवकरच खुला करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र याबाबतची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, या गंभीर परिस्थितीत शेतकरी संघटना किंवा राजकीय पक्षांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. युरिया खताचा पुरवठा सुरळीत करणे, साठेबाजी व काळाबाजार रोखणे, तसेच लिंकिंग पद्धतीवर तातडीने बंदी घालून दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Farmers in ambegaon taluka are facing difficulties due to a shortage of urea fertilizer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Ambegaon
  • Ambegaon taluka
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात
1

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
2

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
3

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
4

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.