Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीना नदीवरील बंधारे पडले कोरडे; आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 05:11 PM
मीना नदीवरील बंधारे पडले कोरडे; आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

मीना नदीवरील बंधारे पडले कोरडे; आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:

रांजणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे या गावांना मीना नदीचे पात्र वरदान ठरले असून, येथे सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यंदा या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे मीना नदीपात्र कोरडेठाक पडले आहे.

 

या भागातील बहुतांश शेतकरी मिना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शेतीपिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील विहीरींनीही तळ गाठला असून, अनेक बोअरवेलही पाण्याअभावी बंद पडले आहेत. केटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे नदीवरील वीजपंप उघड्यावर पडले आहेत. शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांना पाणी द्यायचे कुठून ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पिकांना पाण्याची नितांत गरज

परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा पिक अंतिम टप्प्यात आले असून, काही शेतकऱ्यांचे उसाचे पिक तसेच मोठ्या प्रमाणावर गुरांचा चारा पिकेही आहेत. सध्या या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. आताच पाणीटंचाई निर्माण झाल्याने या पुढील काळात शेतीपिकांना पाणी द्यायचे कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या भागातील शेतकरी नदिच्या पाण्यावर अवलंबुन असुू सध्या पाण्याअभावी शेती पिके सुकून चालली आहेत, तरी जलसिंचन विभागाने लवकरात लवकर मीना नदीला पाणी सोडण्याची कार्यवाही करावी व तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्याची गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे .

तालुक्याच्या पुर्व भागात मीना नदीवरील नागापुर-वळती केटी बंधाऱ्यावरीली पाणी गळतीमुळे बंधारे लवकर कोरडे पडले. अंतिम टप्प्यात आलेले कांदा पिक, जनावरांची चारा पिके धोक्यात आली आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजन व केटी बंधारे यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पाणी गळतीमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने दखल घेऊन त्वरीत पाणी गळतीवर उपाय करून नदी पात्रात त्वरीत पाणी सोडण्यात यावे. – तबाजी लोखंडे, शेतकरी, वळती

कोल्हापूरकरांना अवकाळीचा दिलासा

गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या चटक्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी पहिल्याच अवकाळी पावसाने थोडासा का होईना दिलासा दिला. शहरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला शहराच्या आसपास च्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दुपारी तीनच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र गारवा निर्माण झाला होता. उकाड्‌यापासून नागरिकांची तात्पुरती तरी सुटका झाली अशी भावना सर्वत्र होती. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला होता. दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत होता. मात्र, शनिवारी दुपारी अचानक ढगांची दाटी झाली आणि पावसाला सुरुवात झाली. या अनपेक्षित पावसामुळे कोल्हापूरकरांना एक प्रकारे सुखद धक्काच मिळाला.

हे सुद्धा वाचा : यंदा तिखट-मसाल्याच्या दरामुळे डोळ्यांत येणार पाणी; अवकाळीचा बसतोय मोठा फटका

Web Title: Farmers in ambegaon taluka are worried as the embankments on the meena river have dried up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Ambegaon
  • Ambegaon taluka
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
3

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.