Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आळेफाटा परिसरात कांदा काढणीची लगबग; दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात

सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसतानाही जुन्नर तालुक्यातील शेतकरी मात्र खचलेला दिसत नाही. “शेती थांबत नाही” हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2026 | 12:30 AM
आळेफाटा परिसरात कांदा काढणीची लगबग; दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात

आळेफाटा परिसरात कांदा काढणीची लगबग; दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसतानाही जुन्नर तालुक्यातील शेतकरी मात्र खचलेला दिसत नाही. “शेती थांबत नाही” हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून आळेफाटा परिसरातील शेतांमध्ये सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे. आळे, संतवाडी, कोळवाडी, लवनवाडी, राजुरी, तांबेवाडी, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज नंबर एक व नंबर दोन परिसरातील शेतांमध्ये सकाळपासून मजूरांच्या सहाय्याने कांदा काढणीचे काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारभावाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे.

 

खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे असतानाही पिक शेतात जास्त काळ ठेवणे धोकादायक ठरू शकते. उन्हामुळे कांद्याचे नुकसान होऊ नये, तसेच पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर काढणीकडे वळले आहेत.

तापमानात मोठी वाढ

सध्या तापमानात मोठी वाढ झाली असून, दुपारच्या वेळेत उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत आहे. त्यामुळे कांदा काढणी करणारे मजूर आणि शेतकरी दोघेही स्वतःची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. डोक्यावर टॉवेल, टोपी, चेहऱ्यावर कापड, सोबत पाण्याच्या बाटल्या आणि मधूनमधून सावलीत विश्रांती घेत काम सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्वत्र दिसून येत आहे. काही ठिकाणी महिला वर्गही मोठ्या प्रमाणावर कांदा वेचणी व गोणीत भरण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. कांदा काढणीनंतर तो शेतात सुकवणे, त्याची प्रतवारी करणे आणि बाजारपेठेत पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र कमी बाजारभावामुळे वाहतूक, मजुरी आणि इतर खर्च वजा जाता हातात फारसे काही उरत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

भाव नसला तरी पिक काढावेच लागते

“भाव नसला तरी पिक काढावेच लागते, कारण शेती थांबवून चालत नाही,” अशी भावना चंद्रकांत घोडके, राजेश कणसे, वसंत कदम, शिवाजी डुंबरे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सततच्या बदलत्या हवामानामुळे आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंतेत असला तरी मेहनतीच्या जोरावर तो पुन्हा उभा राहत असल्याचे चित्र आळेफाटा परिसरात पाहायला मिळत आहे. उन्हाच्या कडाक्यातही शेतात घाम गाळणारा बळीराजा आजही आशेवर शेती करत असल्याची भावना या कांदा काढणीच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Web Title: Farmers in junnar taluka are in trouble due to the fall in onion prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Farmers
  • onion
  • Onion News

संबंधित बातम्या

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
1

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च
3

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
4

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.