Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ, पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण; आगारातील बसेसची संख्या तब्बल…

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने तळेगाव एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट एसटी बसेसचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 01:55 PM
मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ, पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण; आगारातील बसेसची संख्या तब्बल...

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ, पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण; आगारातील बसेसची संख्या तब्बल...

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने तळेगाव एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट एसटी बसेसचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून या नव्या बसेस उपलब्ध झाल्याने मावळातील ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली आणि आधुनिक परिवहन सेवा मिळणार आहे.

मावळ तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, बाजारपेठ तसेच विविध शासकीय कामांसाठी प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नव्या बसेस उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांना या बसेसचा मोठा फायदा होणार आहे.

तळेगाव आगारात यापूर्वी ३८ बसेस कार्यरत होत्या. गतवर्षी मिळालेल्या १० आणि यावर्षी आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या पाच अशा एकूण १५ नव्या बसेस आगारात दाखल झाल्याने आता आगारातील बसेसची संख्या ४३ झाली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील विविध ग्रामीण मार्गांवरील एसटी सेवा अधिक सक्षम करण्यास मदत होणार असून प्रवाशांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा आहे.

‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेसमध्ये ३×२ आसन व्यवस्था असून तब्बल ५६ प्रवाशांची आसन क्षमता आहे. जुन्या साधारण बसेसच्या तुलनेत या बसेसमध्ये १६ आसने अधिक आहेत. त्यामुळे अधिक प्रवाशांना एकाच फेरीत प्रवास करता येणार असून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून प्रत्येक बसमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पॅनिक बटण उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक थांबा आणि आवश्यक सूचना स्पष्टपणे प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, मार्गाची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिजिटल मार्ग फलक आणि बसचे थेट लोकेशन ट्रॅक करण्यासाठी जीपीएस यंत्रणा उपलब्ध आहे.

नव्या स्मार्ट बसेसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. लोकार्पणप्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी नव्या बसेसची पाहणी करून एसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रवाशांना दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सुरक्षित आणि विश्वासार्ह एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या या पाच नव्या स्मार्ट बसेसमुळे एसटी सेवेच्या विस्ताराबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधांमध्येही महत्त्वपूर्ण वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा : प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

Web Title: Five rajmata jijau smart st buses were inaugurated by mla sunil shelke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • maval news
  • st bus
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त
1

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.