Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विना लेबल तूप, भेसळीच्या संशयावरून नमकीन जप्त; दोन कारवायांत १.२२ लाखांचा साठा ताब्यात

FDA raid Pune mislabeled ghee seizure: ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे व सोलापूरमध्ये कारवाई करत विना लेबल तूप आणि भेसळीच्या संशयित नमकीनचा सुमारे १.२२ लाखांचा साठा जप्त करून एका आस्थापनेचा परवाना निलंबित केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 08:12 PM
तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

Follow Us
Follow Us:
  • विना लेबल तूप, भेसळीच्या संशयावरून नमकीन जप्त
  • दोन कारवायांत १.२२ लाखांचा साठा ताब्यात
  • ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत कारवाई
पुणे शहर : ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे व सोलापूर येथे धडक कारवाई करत विना लेबल तूप आणि भेसळीच्या संशयावरून नमकीनचा सुमारे १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त केला. पुण्यातील एका आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

तहानलेल्या पिंपरी-चिंचवडला अखेर दिलासा! मुख्यमंत्र्यांकडून पवना प्रकल्पाला हिरवा कंदील; तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पिंपळे गुरव येथील मे. देवांश मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. यावेळी २३० किलो वजनाचा, सुमारे ९० हजार ५०० रुपयांचा तुपाचा साठा विना लेबल असल्याचे तसेच भेसळीचा संशय असल्याचे आढळून आले. हा साठा जप्त करण्यात आला. तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटींची दखल घेत ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) विश्वजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शि. ग. घाटोळ यांनी सा. सु. पटवर्धन व अक्षय शेळके यांच्या पथकासह केली.

दरम्यान, सोलापूर कार्यालयाच्या पथकाने मे. संगीता फूड प्रॉडक्ट्स या आस्थापनेची तपासणी केली. यामध्ये लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून १६० किलो नमकीनचा ३२ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कि. घ. देशमुख यांनी केली.

विनापरवाना किंवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्या तसेच दर्जाहीन, भेसळयुक्त अथवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया व विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिला आहे.

Saswad News: सासवड-वाघापूर रस्त्यावर मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढेंच्या धसक्याने बेकायदेशीर कृत्य?

Web Title: Food adulteration pune fda raid ghee namkeen seizure maharashtra action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • FDA
  • Maharashtra. Pune
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ
1

MPCB News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 6 अधिकारी निलंबित;पुण्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित
2

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
3

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
4

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.