देशामध्ये पहिल्या रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला काल रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. देशात प्रथमच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. दरवर्षी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा या वेळी रात्री घेण्याचे कारण म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. मात्र ही स्पर्धा रात्री घेण्यात आली असली तरी धावपटूंचा आणि पुणेकरांचा उत्साह मात्र आजिबात कमी नव्हता.
पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली.
[read_also content=”युक्रेनमध्ये अडकलेले 250 विद्यार्थी दिल्ली विमानतळावर पोहोचले, एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/250-students-stranded-in-ukraine-arrive-at-delhi-airport-another-air-india-flight-arrives-in-india-nrps-245902.html”]