Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नो कॅप’ ते ‘रेड फ्लॅग’… पुण्यातही ‘जेन झी’ची डिजिटल भाषा सुपरहिट; कॉलेजच्या तरुणांच्या संवादात…

भाषातज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पिढीची स्वतःची भाषा असते. पूर्वी एसएमएसमधील शॉर्टफॉर्म लोकप्रिय होते, तर आज 'जेन झी'ची भाषा रील्स, मीम्स आणि व्हायरल ट्रेंडमधून घडत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 02:35 AM
‘नो कॅप’ ते ‘रेड फ्लॅग’… पुण्यातही ‘जेन झी’ची डिजिटल भाषा सुपरहिट; कॉलेजच्या तरुणांच्या संवादात…
Follow Us
Follow Us:

डिजिटल स्लँग शहरातील तरुणांच्या संवादाचा अविभाज्य भाग
सोशल मीडियामुळे तरुणांच्या संवादशैलीत मोठा बदल
‘घोस्टिंग’ म्हणजे कोणतेही स्पष्टीकरण न देता अचानक संपर्क तोडणे

पुणे/किरण ढोणे:  “नो कॅप”, “रेड फ्लॅग”, “डिलुलू”, “घोस्टिंग”, “सिच्युएशनशिप”, “आयवायकेवायके (IYKYK)”… हे शब्द ऐकून अनेकजण गोंधळतात. मात्र, पुण्यातील महाविद्यालयीन तरुण आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या ‘जेन झी‘साठी ही आता रोजच्या बोलण्यातील सहज वापरली जाणारी भाषा बनली आहे. इन्स्टाग्राम रील्स, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावामुळे हे डिजिटल स्लँग शहरातील तरुणांच्या संवादाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

एफसी रोड, डेक्कन, कोथरूड, वाकड, औंध, खराडी, बाणेर या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. मित्रांशी गप्पा असोत, सोशल मीडियावरील पोस्ट असो किंवा व्हॉट्सअॅप चॅट, कमी शब्दांत नेमकी भावना व्यक्त करण्यासाठी या शॉर्टफॉर्मचा वापर केला जात आहे.

भाषातज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पिढीची स्वतःची भाषा असते. पूर्वी एसएमएसमधील शॉर्टफॉर्म लोकप्रिय होते, तर आज ‘जेन झी’ची भाषा रील्स, मीम्स आणि व्हायरल ट्रेंडमधून घडत आहे. त्यामुळे अनेक इंग्रजी शब्दांचे अर्थ बदलले असून त्यांना नवा डिजिटल संदर्भ मिळाला आहे.
उदाहरणार्थ, ‘नो कॅप’ म्हणजे “मी जे सांगतोय ते अगदी खरं आहे.” ‘कॅप’ म्हणजे खोटं बोलणं. ‘स्ले’ हा शब्द एखाद्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे किंवा आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करण्यासाठी वापरला जातो. ‘डिलुलू’ म्हणजे वास्तवापासून दूर जाऊन कल्पनांच्या जगात रमणारी व्यक्ती.

ऑनलाइन शंभर मित्र, पण ‘जिवलग’ किती? तरुणाईच्या नजरेतून डिजिटल मैत्रीचा नवा चेहरा

नातेसंबंधांशी संबंधित शब्दांचाही वापर वाढला आहे. ‘घोस्टिंग’ म्हणजे कोणतेही स्पष्टीकरण न देता अचानक संपर्क तोडणे, ‘सिच्युएशनशिप’ म्हणजे मैत्री आणि प्रेमसंबंध यांच्यामधील अनिश्चित नाते, तर ‘रेड फ्लॅग’ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात दिसणारा धोक्याचा इशारा. ‘इक’ हा शब्द एखाद्या छोट्याशा सवयीमुळे अचानक आकर्षण कमी होण्यासाठी वापरला जातो, तर ‘टच ग्रास’ म्हणजे सोशल मीडियातून बाहेर पडून वास्तवात जगण्याचा सल्ला.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, सोशल मीडियामुळे तरुणांच्या संवादशैलीत मोठा बदल झाला आहे. कमी वेळेत अधिक प्रभावीपणे भावना व्यक्त करण्यासाठी हे स्लँग वापरले जात असले, तरी अनेकदा पालक आणि तरुणांमधील संवादात या शब्दांमुळे गैरसमजही निर्माण होतात. त्यामुळे या नव्या डिजिटल भाषेचा अर्थ समजून घेणे गरजेचे ठरत आहे. पुण्यासारख्या शिक्षणनगरीत देशभरातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्यामुळे ही भाषा आणखी वेगाने रुजत आहे. त्यामुळे आज “नो कॅप” किंवा “रेड फ्लॅग” हे शब्द केवळ इंटरनेटपुरते मर्यादित राहिले नसून तरुणांच्या दैनंदिन संवादाचाच भाग बनले आहेत.

जेन झी’ म्हणजे कोण? 
१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड (Gen Z). इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात वाढलेल्या या पिढीची ओळख वेगवान डिजिटल संवाद, शॉर्टफॉर्म, मीम्स, इमोजी आणि नव्या स्लँग शब्दांमुळे आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडनुसार त्यांची भाषा सातत्याने बदलत असून, नवे शब्द आणि अभिव्यक्ती दैनंदिन संवादाचा भाग बनत आहेत.

जेन झीचे लोकप्रिय शब्द आणि त्यांचा अर्थ 
शब्द. अर्थ
No Cap- मी जे सांगतोय ते अगदी खरं आहे
Cap- खोटं बोलणं किंवा दिशाभूल करणं
Slay- एखादं काम किंवा लूक खूपच उत्कृष्ट असणं
Delulu- भ्रमात किंवा अवास्तव कल्पनांमध्ये जगणारी
व्यक्ती
IYKYK.- ज्यांना माहिती आहे, त्यांनाच अर्थ कळेल
Ghosting- कोणतेही स्पष्टीकरण न देता संपर्क तोडणे
Sus- संशयास्पद वाटणारी गोष्ट किंवा व्यक्ती
Red Flag- धोक्याचा किंवा सावध राहण्याचा इशारा
Touch Grass- सोशल मीडियातून बाहेर पडून
वास्तवात जग
Situationship-  मैत्री आणि प्रेमसंबंध यांच्यामधील
अनिश्चित नातं
Ick-  एखाद्या छोट्या गोष्टीमुळे
अचानक आकर्षण कमी होणं

‘जेन झी’ची आवडती डिजिटल दुनिया 
४१.४ कोटी : भारतातील इन्स्टाग्राम वापरकर्त्यांची अंदाजे संख्या.
२५ कोटी+ : भारतातील स्नॅपचॅटचे मासिक सक्रिय (MAU) वापरकर्ते.
९०% : स्नॅपचॅटवरील भारतीय वापरकर्त्यांपैकी १३ ते ३४ वयोगटातील तरुण.
१०० कोटी+ : डिस्कॉर्डचे जगभरातील नोंदणीकृत वापरकर्ते; गेमिंग, कॉलेज कम्युनिटी आणि स्टडी ग्रुपमध्ये वाढता वापर.
रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंचा प्रभाव : ‘नो कॅप’, ‘रेड फ्लॅग’, ‘घोस्टिंग’, ‘डिलुलू’, ‘स्ले’ यांसारखे शब्द इन्स्टाग्राम रील्स, स्नॅपचॅट आणि टिकटॉकमधून सर्वाधिक लोकप्रिय झाले.
पुणे : शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्समध्ये या डिजिटल स्लँगचा वापर झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण.

Delulu, FOMO, Aura… Gen-Z ची भाषा ऐकून गोंधळलात? एका क्लिकमध्ये सर्व ट्रेंडिंग शब्दांचा अर्थ जाणून घ्या

कोणती पिढी कोणती :

पिढी/ जन्मवर्ष
बेबी बूमर्स (Baby Boomers) १९४६-१९६४
जनरेशन एक्स (Gen X) १९६५-१९८०
मिलेनियल्स / जनरेशन वाय
(Millennials / Gen Y) १९८१-१९९६
जनरेशन झेड (Gen Z) १९९७-२०१२
जनरेशन अल्फा (Gen Alpha) २०१३ नंतर

Web Title: Gen z digital slang trend gains momentum pune new terms popularized through instagram social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Gen Z
  • navarashtra special
  • pune news
  • Social Media
  • Youth

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
1

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
2

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
3

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
4

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.