Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune शहरात नेमका ऋतू कोणता? तापमान थेट 37 अंशाच्या पुढे; नागरिक हैराण, मात्र 4 दिवसांमध्ये…

किमान तापमान देखील १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामध्ये पुढील तीन ते चार दिवसांत मोठी घट होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 08:29 PM
Pune शहरात नेमका ऋतू कोणता? तापमान थेट 37 अंशाच्या पुढे; नागरिक हैराण, मात्र 4 दिवसांमध्ये...

Pune शहरात नेमका ऋतू कोणता? तापमान थेट 37 अंशाच्या पुढे; नागरिक हैराण, मात्र 4 दिवसांमध्ये...

Follow Us
Follow Us:

पुणे शहरातील उकाड्यात वाढ 
कमाल तापमान ३७ अंशावर 
पुणेकर उकाड्याने हैराण

पुणे: गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी (ता. २४) यामध्ये अधिक वाढ झाली. परिणामी शहरात उन्हाचा चटका वाढला असून पुणेकर उकाड्याने हैराण झाले. मात्र पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमान घट होणार असून ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविण्यात येत होते. मात्र मंगळवारी यामध्ये मोठी वाढ झाली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३७ अंश सेल्सिअस तर उपनगरामध्ये ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. किमान तापमान देखील १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामध्ये पुढील तीन ते चार दिवसांत मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Weather update : सूर्य आग ओकतोय…मार्चमध्येच पारा 40 अंशावर, या वेळेत घराबाहेर पडू नका, Heatwave चा अलर्ट

पुणे आणि परिसरात बुधवारी (ता. २५) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गुरूवारपासून (ता. २६) कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

कोकण की पश्चिम महाराष्ट्र? कुठे जास्त चटके बसणार? जाणून घ्या Weather Report

मार्चमध्येच पारा 40 अंशावर

यंदाच्या हंगामात उष्णतेने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कहर केला आहे. पाच वर्षात पहिल्यांदाच कमाल तापमान 42 अंशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. तसेच काही दिवस तापमानात घसरण झाली असून मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळाला. आता पुन्हा शहर आणि उपनगरांता तीव्र उन्हाचे चटके बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. परिणामी 12 ते 4 घराबाहेर पडताना काळजीपूर्वक बाहेर पडा. कारण गेल्या १० मार्च रोजी मुंबईत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे गेल्या पाच वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे.

Web Title: Heat wave in pune city next 3 to 4 days latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • heat wave
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
1

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
2

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
3

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
4

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.