पुण्याचे हिंजवडीत झाला मुसळधार पाऊस (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही वेळ झालेल्या पवसाने हिंजवडी आयटीपार्कची दाणादाण उडवली आहे.
आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कचे रूपांतर थेट वॉटर पार्कमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. केवळ 10 मिनिटांच्या वेळेत हिंजवडीचे रास्ते पूर्णपणे जलमय झाले.
अनेक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले की काही दुचाकी वाहून गेल्या. रस्त्यावर पाणी सचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 10 मिनिटांच्या पावसाने उडालेली दाणादाण म्हणजे प्रशासनाच्या तयारीचे तीनतेरा वाजवले असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान
राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. दरम्यान मुंबईला पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज सकाळपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हजेरी लावली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथे पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचण निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसाचा 200 हेक्टरवरील पिकांना फटका
ऐन उन्हाळ्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसून नुकसान झाले आहे. 117 गावांतील 604 शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील 14 दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 238 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत.
Monsoon Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान; IMD चा अलर्ट काय?
दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळली भर झोपेत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब उधवस्त झाली. या सगळ्याची पुनरावृत्ती आता कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे होताना दिसत आहे. इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलना दरम्यान पळसदरीमधल्या ठाकूरवाडी येथील 80 घरांचे स्थलांतरण करण्यात आले होते.