Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Rain : बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली

बारामती शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी (दि ५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. वादळी वाऱ्यासह बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र यामध्ये नुकसानच अधिक झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2026 | 01:30 PM
बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली

बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी (दि ५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक ठिकाणी केळी, ऊस यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण दिन दिवशीच अनेक झाडे कोसळल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान वादळी वाऱ्यासह बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र यामध्ये नुकसानच अधिक झाले.

 

बारामती शहरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बारामती शहरातील सातव चौक शेजारील शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील अनेक झाडे कोसळली, यामध्ये काही वाहनांवर झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. बारामती शहरातील इंदापूर रोड, माळेगाव रोड, पाटस रोड या भागातील देखील अनेक झाडे वादळी वाऱ्यामुळे कोसळली. बारामती नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने कोसळलेली झाडे रस्त्यापासून बाजूला काढली आहेत.

तांदुळवाडी रोडवर एका भाजी विक्रेत्याच्या स्टॉलच्या जवळच अचानक झाड कोसळले, या स्टॉलमध्ये भाजी विक्रेता महिला व काही ग्राहक उभे होते, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. बारामती तालुक्यातील माळवाडी यासह इतर भागात देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली, बारामती शहरासह विविध भागात पडलेल्या झाडांमुळे त्यांनी वेदना व्यक्त करत ज्या ठिकाणी झाडे पडलेले आहेत त्या ठिकाणी झाडांची नव्याने लागवड करण्याच्या सूचना त्यांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांना दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : नवी मुंबई विमानतळावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण; दि. बा. पाटील यांचेच नाव कायम राहणार; फडणवीसांची मोठी घोषणा

बारामती शहरात शुक्रवारी (दि ५)सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली, तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बारामती नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सचिन सातव मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यान्वित करण्यात आले. नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, सदस्य/सदस्या यांनी शहरातील सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून तत्काळ शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत मार्गांवर उन्मळून पडलेली मोठी झाडे व तुटलेल्या फांद्या जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने तत्काळ हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच शहरात काही ठिकाणी पाणी तुंबलेल्या भागातील गटारांमध्ये अडकलेला कचरा, फांद्या व गाळ काढून पाण्याचा निचरा करण्यात आला. गटारे तात्काळ साफ करण्यात आले.

Web Title: Heavy rains have caused extensive damage in the baramati area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • baramati
  • Rain News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
1

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
2

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
3

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
4

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.