बारामतीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
बारामती, प्रतिनिधी : बारामती शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच नगरपरिषदेच्या यंत्रणेने अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत केली. सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत तब्बल १५८ मिमी पावसाची नोंद झाल्याने शहरातील सखल भाग जलमय झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या सूचनांनुसार प्रशासनाने तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. (Baramati News)
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले. मुख्य भिगवण रस्त्यासह प्रमुख मार्गांवर पाण्याचे लोट आल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. सकाळच्या वेळेत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या.
पावसाची तीव्रता आणि शहरातील परिस्थितीची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. नगराध्यक्ष सचिन सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत सखल भागांतील पाण्याचा निचरा आणि वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्यात आला. पार्थ पवार आणि जय पवार यांनीही आवश्यक सूचना केल्या.
Rain Update: बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट
नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाला गती दिली. पाण्याचा निचरा करणे, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली. सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यात आला. परिणामी, अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात यश आले.
स्वर्गीय अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासोबतच प्रशासनात तत्परता, शिस्त आणि नागरिकांच्या प्रश्नांप्रती बांधिलकीची कार्यसंस्कृती रुजवली. संकटाच्या काळात तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देण्याची हीच परंपरा या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली. मुसळधार पावसाचे मोठे संकट उभे राहिले, तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न करण्यात आले.
एका रात्रीत १५८ मिमी पाऊस, शहरातील सखल भागांत पाणी आणि वाहतुकीसमोर आव्हान असतानाही प्रशासनाने दाखवलेली तत्परता लक्षवेधी ठरली. संकट कितीही मोठे असो, नागरिकांच्या मदतीसाठी बारामतीची यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या कामगिरीतून मिळाला.
मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन
Ans: सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत बारामतीत १५८ मिमी पावसाची नोंद झाली.
Ans: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनीही आवश्यक सूचना दिल्या.
Ans: नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत केली.






