टपाल विभागात महिलांचा वाढता सहभाग (फोटो- ai gemini)
टपाल विभागातील नोकरी आता केवळ शहरातील महिलांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण भागातील मुली आणि महिलाही मोठ्या संख्येने या सेवेकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण डाक सेवक (GDS) म्हणून काम करण्याची संधी ग्रामीण महिलांसाठी रोजगाराचा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. पुणे जिल्ह्यात ४६३ महिला ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यात पुणे MFL विभागातील सर्वाधिक १९७ महिला, बारामतीतील १३१ महिला, पुणे शहर पूर्व विभागातील ८५, तर पुणे शहर पश्चिम विभागातील ५० महिला GDS म्हणून काम करत आहेत.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी दहावीपर्यंतचे शिक्षण असलेल्या उमेदवारांनाही संधी मिळत असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी टपाल विभाग हा शिक्षणानंतर रोजगाराचा मार्ग ठरत आहे. उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे शक्य नसलेल्या किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण थांबलेल्या मुलींना आपल्या गावाजवळच काम करण्याची संधी मिळते. यामुळे “दहावीपर्यंत शिक्षण, त्यानंतर नोकरी आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे” असा प्रवास अनेक ग्रामीण मुलींसाठी शक्य होत आहे. नियमित उत्पन्नासोबतच सरकारी यंत्रणेचा भाग म्हणून काम करण्याचा आत्मविश्वासही त्यांना मिळत आहे.
ग्रामीण भागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी या नोकरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कामाची सांगड त्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी घालत आहेत. घरातील स्वयंपाक, मुलांची जबाबदारी, शेतीची कामे आणि कुटुंबाची देखभाल करत असतानाच टपाल सेवेतही त्या आपली भूमिका बजावत आहेत. गावातील नागरिकांना पत्रे आणि टपाल पोहोचविण्यापासून विविध टपाल व आर्थिक सेवा देण्यापर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला केवळ सेवा घेणाऱ्या नव्हे, तर सेवा देणाऱ्या भूमिकेतही पुढे येत आहेत.
विभागीय सेवेतही महिलांची मोठी उपस्थिती :
ग्रामीण डाक सेवकांबरोबरच विभागीय टपाल सेवेतही महिलांची संख्या लक्षणीय आहे. पुणे शहर पश्चिम विभागात २३१, पुणे शहर पूर्व विभागात २२२, RMS B विभागात ९०, पुणे MFL मध्ये ५८, बारामतीत ३४ आणि पुणे रिजन कार्यालयात १७ महिला कार्यरत आहेत.
म्हणजेच, ग्रामीण भागातील पोस्टमनपासून शहरातील विभागीय कार्यालयांपर्यंत टपाल विभागाच्या विविध स्तरांवर महिलांची उपस्थिती ठळक होत आहे. आर्थिक स्वावलंबन, घराजवळ रोजगार आणि सरकारी सेवेत काम करण्याची संधी यामुळे ग्रामीण भागातील मुलींसाठी टपाल विभागाची नोकरी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
पुणे जिल्ह्यातील महिला कर्मचारी (विभागीय सेवा)
टपाल विभाग. महिला GDS संख्या
पुणे शहर पूर्व. 85
पुणे शहर पश्चिम. 50
पुणे MFL. 197
बारामती. 131
एकूण. 463
एकूण ग्रामीण डाक सेवक महिला
463 (41.5%)
ग्रामीण भागातील महिलांचा वाढता सहभाग
पुणे जिल्ह्यातील महिला कर्मचारी (विभागीय सेवा) :
टपाल विभाग. महिला विभागीय कर्मचारी संख्या
पुणे शहर पूर्व. 222
पुणे शहर पश्चिम. 231
पुणे MFL. 58
बारामती. 34
RMS B विभाग. 90
पुणे रिजन कार्यालय. 17
एकूण. 652
एकूण महिला कर्मचारी (विभागीय सेवा)
652 (58.5%)
पुणे जिल्ह्यात एकूण महिला कर्मचारी
1115 (100%)
टपाल सेवेत महिलांचा वाटा जवळपास
60 टक्क्यांवर






