Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत तब्बल १ लाख १७ हजार शिरूर, हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज मतदारयादी अद्ययावतीकरणासाठी शिरूर विधानसभा मतदारसंघात १० हजार ३८१, तर हडपसरमध्ये १० हजार ५०६ अर्ज दाखल झाले आहेत. वहगाय शेरीमध्ये ९ हजार ७३, भीरमध्ये ९ हजार ३९६, चिंचवडमध्ये ८ हजार ४३४ आणि खेड-आळंदीमध्ये ८ हजार ११३ अर्जाची नोंद झाली आहे. या मतदार संघांत मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी तुलनेने अधिक प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी ही माहिती दिली.
८१८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी आलेल्या ८३ हजार ५१४ अर्जाचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र, शिवाजीनगर आणि कसबा पेठ या महत्त्वाच्या मतदारसंघांत अर्जाची संख्या तुलनेने कमी असल्याने या कडेवारीची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय आयोगाच्या सूचनेनुसार मतदारयादीतील नोंदींची पडताळणी आणि अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मतदारयादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी ३२ हजार ८८०, तर नावे वगळण्यासाठी १ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना
शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अवधे ३ हजार ४४१ अर्ज दाखल झाले आहेत. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि तरुण मतदारांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या या मतदारसंघात नव्या मतदार नोंदणीसाठी अधिक अर्ज येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात अजाँची संख्या तुलनेने कमी आहे. कसबा पेठ मतदारसंघात ३ हजार ६४० अर्ज दाखल झाले आहेत, कोथरूडमध्ये ४ हजार ७६२. पर्वतीमध्ये ३ हजार ६. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ३ हजार ९२९, तर बारामतीमध्ये ३ हजार ८०० अर्ज आले आहेत.
निवडणुकीच्या राजकारणात मतदारयादीला महत्त्वाचे स्थान असल्याने नवीन मतदारांची नोंदणी आणि विद्यमान मतदारांच्या तपशिलातील दुरुस्ती या प्रक्रियांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे विशेषतः नवमतदारांची संख्या आणि मतदारयादीती अचूक नोंदी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या उस् शकतात. मात्र, अर्जाची संख्या म्हणजे प्रत्यक्ष वाढलेल्या मतदारांची संख्या नव्हे, ते छाननी झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
Ans: पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १ लाख १७ हजार ८१८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
Ans: हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १० हजार ५०६ तर शिरूर मतदारसंघात १० हजार ३८१ अर्ज दाखल झाले आहेत.
Ans: केंद्रीय निवडणूक आयोगाने फॉर्म ६ मधील अतिरिक्त तपशील वगळल्यामुळे आणि पुराव्यांच्या कागदपत्रांत शिथिलता आणल्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ झाली आहे.






