Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी वकील पाठवला; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडेही बारामती पोटवडणूकीसाठी रिंगणात आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 01:27 PM
माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी वकील पाठवला; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी वकील पाठवला; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेमुळे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ॲड आकाश विजयराव मोरे यांचा दाखल केलेला अर्ज अखेर मागे घेण्यात आला. मात्र २३ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडेही बारामती पोटवडणूकीसाठी रिंगणात आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये दाखल केलेला माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मुंबईतून वकील पाठवून या उमेदवारी अर्जातील त्रुटी काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करुणा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी मी त्यांची बायको आहे, मात्र मला माझा हक्क देण्यासाठी त्यांची बायको नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मुंडे या बारामती प्रशासकीय भवनमध्ये आल्या होत्या. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याबाबत ठाम भूमिका घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, दिवंगत नेते अजितदादांच्या संशयित अपघात प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतून आपण ही निवडणूक लढवत आहोत. अजितदादांच्या अपघाताची फिर्याद दाखल करून घेतली जात नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अजित दादांसारख्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर माझ्यासारख्या सामान्यांना न्याय कसा मिळेल, त्यामुळे अजित दादांना न्याय मिळण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. मात्र माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मुंबईवरून वकील पाठवला. सदर वकिलाने माझ्या उमेदवारी अर्जामध्ये मी धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याने, मुंडे यांच्या संपत्तीचा उल्लेख केला नसल्याची त्रुटी काढली. वास्तविक पाहता माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी मी त्यांची पत्नी आहे, मात्र मला माझा हक्क अधिकार मिळेल म्हणून, मी त्यांची पत्नी नाही, मुंडे यांची ५००० कोटी पेक्षा अधिक मालमत्ता आहे. बारामती मध्ये अनेक भागात पाण्याचा प्रश्न आहे. अजितदादांची बारामती असूनही त्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही हे दुर्दैव असल्याचे सांगत ही निवडणूक आपण विविध प्रश्न घेऊन लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : उमेदवारी माघारी घेतली तरी काँग्रेस भूमिकेवर ठाम, 2029 ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

Web Title: Karuna munde has made serious allegations against ncp mla dhananjay munde 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • baramati
  • dhananjay munde
  • karuna munde
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati Politics: दोन चिमुकल्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; बारामतीत नेमकं काय झालं?
1

Baramati Politics: दोन चिमुकल्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; बारामतीत नेमकं काय झालं?

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान, केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम
2

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान, केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी
3

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; बड्या नेत्याच्या नावाची चर्चा
4

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.