Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA ने तयार केलेला ‘डीपी’ राज्य शासनाकडून रद्द; महापालिका हद्दीतील 23 गावांच्या विकास आराखड्याचे काम…

शहराचे विकास नियाेजन करण्यासाठी विकास आराखडा (डीपी ) तयार केला जाताे. परंतु हा विकास आराखडा नेहमीच वादग्रस्त ठरत गेला. त्यामुळे ताे विकास आराखडास अंतिम मंजुरी देणे, त्यानुसार अंमलबजावणी करण्यासही विलंब हाेत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2025 | 02:09 PM
PMRDA ने तयार केलेला 'डीपी' राज्य शासनाकडून रद्द; महापालिका हद्दीतील 23 गावांच्या विकास आराखड्याचे काम...

PMRDA ने तयार केलेला 'डीपी' राज्य शासनाकडून रद्द; महापालिका हद्दीतील 23 गावांच्या विकास आराखड्याचे काम...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए ) तयार केलेला विकास आराखजा (डीपी ) राज्य सरकारने रद्द केला आहे. यामुळे पुणे महापालिका हद्दीतील समाविष्ट तेवीस गावांचा विकास आराखड्याचे कामही प्रलंबित राहणार आहे. राज्य सरकारने २०१५ मध्ये पीएमआरडीएची स्थापना केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र वगळून उर्वरीत भागाच्या नियाेजनाची जबाबदारी पीएमआरडीएवर साेपविण्यात आली हाेती.

त्यानुसार २०१७ मध्ये विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर केला गेला. ऑगस्ट २०२१ मध्ये प्रारुप विकास आराखडा तयार करून ताे जाहीर केला गेला. याच कालावधीत पुणे महापािलका हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांचाही विकास आराखडा करण्याची जबाबदारी पीएमआरडीएवर  साेपविली गेली हाेती. हा विकास आराखडा  जाहीर करण्याआधीच हे प्रकरण न्यायालयात गेले.

विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रीयेविषयी तांत्रिक मुद्दे उच्च न्यायालयात दाखल याचिकेत केले गेले हाेते. उच्च न्यायालयाने विकास आराखडाबाबत काेणताही अंतिम निर्णय घेण्यात येऊ नये असे नमूद करीत स्थगिती दिली हाेती. गेल्या तीन वर्षापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित हाेते. अखेर राज्य सरकारने विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची माहीती उच्च न्यायालयास कळविण्याच्या सुचनाही पीएमआरडीए देण्यात आल्या आहेत.

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘PMRDA’चा पुढाकार; घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

 विकास अाराखड्यांचा खेळ खंडाेबा

शहराचे विकास नियाेजन करण्यासाठी विकास आराखडा (डीपी ) तयार केला जाताे. परंतु हा विकास आराखडा नेहमीच वादग्रस्त ठरत गेला. त्यामुळे ताे विकास आराखडास अंतिम मंजुरी देणे, त्यानुसार अंमलबजावणी करण्यासही विलंब हाेत आहे. काही वर्षांपुर्वी येवलेवाडीचा विकास आराखडा तयार केला गेला हाेता, ताे वादग्रस्त ठरला हाेता. महापािलकेच्या हद्दीत समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा  अद्याप प्रलंबित राहीला आहे. ताे महापािलका स्तरावरच पडून आहे. आता महापािलका हद्दीतील तेवीस गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला , पण ताेही रद्द झाला आहे. या समाविष्ट गावांतील नियाेजित विकासाला खाे बसणार आहे.

गावांचा विकास आराखडा टिपी स्कीम नुसार करावा

आपले पुणे आणि आपला परीसर या संस्थेचे उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी , प्रशांत बधे यांनी विकास आराखड्याच्या विराेधात न्यायालयात दाद मागितली हाेती. राज्य सरकारने आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्वागत केले आहे. समाविष्ट गावांचा विकास आराखडा पीएमअारडीएकडून करून घेऊ नये. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विकास आराखड्यामध्ये समानता आणि धोरणात्मक एकात्मता रहावी यासाठी या 23 गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार सहसंचालक पुणे विभाग नगर रचना यांना द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहीती केसकर यांनी दिली.

Web Title: Maharashtra state government cancel pmrda dp about 23 villages in pune corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: दीनानाथ रुग्णालय पुन्हा वादात! डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
1

Pune News: दीनानाथ रुग्णालय पुन्हा वादात! डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रावर पाणी संकट! विहिरी, बोअरवेल आटले; तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा
2

महाराष्ट्रावर पाणी संकट! विहिरी, बोअरवेल आटले; तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा

Pune Crime: पुण्यातील कोंढव्यात तणाव! मुलांच्या भांडणातून दोन गट आमने सामने; पोलीस ठाण्यावर दगडफेक
3

Pune Crime: पुण्यातील कोंढव्यात तणाव! मुलांच्या भांडणातून दोन गट आमने सामने; पोलीस ठाण्यावर दगडफेक

Pune Crime: पुण्यात भररस्त्यात हत्या! अनैतिक संबंधांच्या संशयातून 41 वर्षीय व्यक्तीचा खून
4

Pune Crime: पुण्यात भररस्त्यात हत्या! अनैतिक संबंधांच्या संशयातून 41 वर्षीय व्यक्तीचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.