Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार राहुल कुल यांचे प्रशासनाला आदेश

दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राहुल कुल यांनी दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 02:59 PM
अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार राहुल कुल यांचे प्रशासनाला आदेश

अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार राहुल कुल यांचे प्रशासनाला आदेश

Follow Us
Follow Us:
  • अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
  • शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज
  • आमदार राहुल कुल यांचे प्रशासनाला आदेश
पाटस : दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रशासनाला नुकतेच दिले आहेत. दिनांक १८ आणि दिनांक १९ मार्च रोजी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दौंड तालुक्यातील काही भागातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक शेतकऱ्यांना हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार कुल यांनी महसूल आणि कृषी विभागाला तातडीने घटनास्थळी जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

 

दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचा आणि गारांचा जोर सर्वाधिक होता. यामध्ये प्रामुख्याने यवत, यवत स्टेशन, उंडवडी, खामगाव, खानोटे, पिलानवाडी, दहीटने आणि राहू या गावांचा समावेश आहे. या भागात कांदा, भाजीपाला, फळबागा आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे या आपत्तीमुळे कंबरडे मोडले आहे. तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरात लवकर तयार करून तो शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधितांना शासनाकडून योग्य ती मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार कुल यांनी सांगितले. दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष बाधितांच्या शेतात जाऊन पाहणी करणार असून, यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त

शिरूर पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाचा तडाखा

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास गारांसह झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. विशेषतः कवठे येमाई परिसरातील मुंजाळवाडी, ढगे माथा, येडे बोऱ्हाडे वस्ती आदी भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा व केळी यांसारखी उभी पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, महसूल व कृषी विभागाने तत्परता दाखवत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे शुक्रवारी (दि. २०) सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केले आहेत. सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी पहाटेच कवठे येमाई येथे दाखल होत येडे बोऱ्हाडे वस्ती, टावरे वस्ती, मुंजाळवाडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत पंचनाम्याला सुरुवात केली.

Web Title: Mla rahul kul has ordered the administration to conduct a survey of damaged agricultural crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Rahul Kul

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
4

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.