Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 05:03 PM
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड “शहरात किती मोठे प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना किती सक्षमपणे मिळतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने भपकेबाज प्रकल्पांऐवजी पिण्याचे शुद्ध पाणी आणि आरोग्य सुविधांवर भर द्यावा,” असे स्पष्ट निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

 

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन, उपायुक्त ममता शिंदे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, सुनील भागवानी, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, गटनेते विश्वजित बारणे, निलेश तरस, निलेश बारणे, ऐश्वर्या तरस आणि बापू कातळे उपस्थित होते.

अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत चिंता; पर्यायी स्त्रोतांचा विचार करा

खासदार बारणे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या गंभीर स्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “रावेत आणि निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाणारे पाणी अत्यंत अशुद्ध आहे. देहूरोड आणि किवळे भागातील नाल्यांचे पाणी तसेच काही सोसायट्यांचे सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. भविष्यात नागरिकांना दूषित पाणी मिळण्याची भीती असल्याने प्रशासनाने ‘शिवणे’ बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत तातडीने चाचपणी करावी.”

तसेच, शहरातील १८५ किलोमीटरची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईनच्या जवळून किंवा खालून गेली आहे. अनेक ठिकाणी चेंबर्सची दुरवस्था झाल्याने हे पाणी प्रदूषित होत आहे. ही पाईपलाईन तातडीने बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “शहरातील टँकर लॉबी बंद झाली पाहिजे आणि नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

मोकाट श्वानांसाठी ‘जीपीएस’चा वापर करा

शहरात वाढत्या मोकाट श्वानांच्या उपद्रवावर उपाययोजना म्हणून खासदार बारणे यांनी नाविन्यपूर्ण सूचना केली. मोकाट आणि पाळीव श्वानांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना ‘जीपीएस’ (GPS) सिस्टीम बसवता येईल का, याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामुळे कोणत्या श्वानाने चावा घेतला किंवा त्यांचा वावर कुठे आहे, याची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच श्वानांसाठी विशेष संगोपन केंद्र उभारून रेबीज प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यास त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा

सांडपाणी वाहिन्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याच्या तक्रारी वाढतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

Web Title: Mp shrirang barne has given instructions to the pimpri chinchwad municipal corporation administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Shrirang Barne

संबंधित बातम्या

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
1

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’
2

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.