Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

MPSC Paper Leal Controversy : MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि कारभारावरून महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. अध्यक्ष विवेक भीमनवारांनी आपली बाजू मांडली असून पुण्यात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढत राजीनाम्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 07, 2026 | 09:35 PM
पेपरफुटी वादावर MPSC अध्यक्ष भीमनवारांचं मोठं स्पष्टीकरण

पेपरफुटी वादावर MPSC अध्यक्ष भीमनवारांचं मोठं स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:
  • MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पेपरफुटीची घटना आपल्या रुजू होण्यापूर्वीची असल्याचं स्पष्ट केलं.
  • ‘माझ्याविरोधात कुणी एक पुरावा दिला तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, असं भीमनवार म्हणाले.
  • पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी.
 

MPSC Paper Leal Controversy :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि कारभारावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असताना आता आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यावर सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित झाल्याचं सांगत, आपल्या विरोधात एकही ठोस पुरावा सादर झाल्यास पदावर राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

औषध निरीक्षक गट-ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना ही घटना आपण अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीची असल्याचं भीमनवार यांनी स्पष्ट केलं. तक्रार मिळाल्यानंतर आयोगाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर’

पेपरफुटीच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आयोगाने उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्य सरकारनेदेखील यासाठी उच्चाधिकार समिती गठीत केली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं.

Pune MPSC Student Protest :  MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

आपल्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख करताना भीमनवार यांनी स्पर्धा परीक्षांच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 चाळणी परीक्षा, अशा एकूण 84 परीक्षा पार पडल्याचं सांगितलं. निकाल प्रक्रियेतही सुधारणा झाल्याचा दावा करत आता 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणं शक्य झालं आहे, असं त्यांनी म्हटलं. भविष्यात सर्व परीक्षांचे निकाल एका महिन्यात जाहीर करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश

दरम्यान, एमपीएससीच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठा मोर्चा काढला. ओंकारेश्वर मंदिरापासून सुरू झालेला आक्रोश मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. औषध निरीक्षक परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आंदोलक विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

Pune MPSC Student Protest : ‘जनाची नाही, मनाची तरी असेल तर ..,’रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

या आंदोलनाला शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजीत कदम हे आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना रोहित पवार यांनी, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत प्रश्न विचारण्यात राजकारण काय, असा सवाल उपस्थित केला.

Web Title: Mpsc paper leal controversy mpsc paper leak controversy vivek bhimanwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
1

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…
2

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!
4

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.