Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता आणि निकालातील गोंधळाविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Sep 07, 2026 | 09:59 PM
MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक

MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा.
  • ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग; काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते सहभागी.
  • विश्वजीत कदमांनी परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांची जबाबदारी निश्चित करून पारदर्शकता आणण्याची मागणी केली.
 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, मूल्यमापनातील संशय आणि निकालातील गोंधळाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. MPSC अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला.

विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकातून सुरू झाला. त्यानंतर मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या आवाहनानंतर माजी मंत्री आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोहन जोशी, प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी, भाऊसाहेब आजबे, हनुमंत पवार, आमिर शेख यांच्यासह NSUI, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

यावेळी बोलताना विश्वजीत कदम यांनी MPSC परीक्षा व्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला. राज्यातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, परीक्षा प्रक्रियेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत असतील तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असं कदम म्हणाले.

“MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणलं पाहिजे,” अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे MPSCच्या परीक्षा प्रक्रियेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे.

Pune MPSC Student Protest :  MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Web Title: Mpsc student protest pune chairman secretary resignation vishwajeet kadam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Congress
  • MPSC Paper Leak
  • pune news
  • Student Protest

संबंधित बातम्या

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
1

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…
2

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
4

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.