
MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि भविष्याची राखरांगोळी झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि भविष्याची राखरांगोळी झाली आहे. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज 07 सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या विराट आक्रोश मोर्चाला काँग्रेसचा ठाम पाठिंबा आहे. MPSC सारख्या स्वायत्त आणि संवेदनशील संस्थेचा कारभार पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत कोणतीही तडजोड काँग्रेसला मान्य नाही.”
पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि भविष्याची राखरांगोळी झाली आहे. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज 07 सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या विराट आक्रोश मोर्चाला काँग्रेसचा ठाम पाठिंबा आहे. MPSC सारख्या स्वायत्त आणि संवेदनशील… pic.twitter.com/1LiXrBDqAB — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) September 7, 2026
ते पुढे म्हणाले, “परीक्षा पारदर्शक असावी, भरती प्रक्रिया निष्पक्ष असावी आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात उतरेल. विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही; त्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आता अधिक बुलंद होईल!”
Pune MPSC Student Protest : ‘जनाची नाही, मनाची तरी असेल तर ..,’रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सोशल मीडिया पोस्ट करत MPSC प्रकरणावरून सरकारला जाब विचारला. “मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा केवळ परीक्षा घेणारी संस्था नसून, राज्यातील लाखो युवक-युवतींच्या कठोर परिश्रमांचा, त्यांच्या स्वप्नांचा तसेच त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा विश्वासाचा आधार आहे. वर्षानुवर्षे परिश्रम करून विद्यार्थी या व्यवस्थेवर विश्वास ठेवून स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात.”
“मात्र आपल्या सरकारच्या कार्यकाळात MPSC संदर्भात, विशेषतः ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांसह, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व विश्वासार्हता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सदर आरोपांची निष्पक्ष, स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा केवळ परीक्षा घेणारी संस्था नसून, राज्यातील लाखो युवक-युवतींच्या कठोर परिश्रमांचा, त्यांच्या स्वप्नांचा तसेच त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा विश्वासाचा आधार आहे. वर्षानुवर्षे परिश्रम करून विद्यार्थी या व्यवस्थेवर विश्वास… — Nana Patole (@NANA_PATOLE) September 7, 2026
“आज पुणे येथे हजारो विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत, त्यांच्या मागण्या रास्त व स्पष्ट आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्ष चौकशी, वेळबद्ध भरती प्रक्रिया, गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा एवढच त्यांचं म्हणणं आहे.”
“केवळ आश्वासनांद्वारे हा प्रश्न मार्गी लागणार नाही. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा आणि संबंधित निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी,” असे ते म्हणाले.