Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

पुणे महापालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नावावर मत मागणारे चंद्रकांत दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? असा उपरोधिक सवाल बालवडकर यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 25, 2026 | 02:35 PM
मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात नवा वाद पेटला आहे. त्यांनी थेट ‘पेपरफुटी’ची तुलना ‘आंबा चोरी’शी केल्यामुळे राजकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेते प्रचंड आक्रमक झाले असून, राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नावावर मत मागणारे चंद्रकांत दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? असा उपरोधिक सवाल अमोल बालवडकर यांनी विचारला आहे.

 

अमोल बालवडकर फेसबुक पोस्ट करुन म्हणाले की, पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पक्षावर एवढी तीव्र टीका, आक्षेपार्ह टिप्पणी आणि पोस्टर्स झळकत असताना महाराष्ट्राचे उच्च तंत्र मंत्र मंत्री चंद्रकांत दादा कुठे आहेत? तुम्हाला कोणीही राजीनामा मागितला नाही तरी कुठे गायब आहात… मोदीजींच्या नावावर मते मागणारे तुम्ही आज मौन का बाळगत आहेत? विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना तुमची भूमिका काय आहे? जनतेसमोर येऊन ते आपली भूमिका स्पष्ट का करत नाहीत? ही शांतता नेमकी कशाची आहे? मोदींच्या नावावर फक्त मतं मागायचे, मोदींची अस्मिता अडचणीत आल्यावर घरात लपून बसायचे हेच का तुमचे मोदीजी प्रेम? पुणेकरांच्या मनात एकच प्रश्न आहे, चंद्रकांत दादा कुठे आहे?

कॉकरोच जनता पार्टीच्या पुण्यात झालेल्या भव्य मोर्चानंतर केलेल्या या पोस्टमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. बालवडकर यांच्या या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील काय उत्तर देणार, याकडे आता राजकीय वर्तुळासह पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्या राजकीय शाब्दिक संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा : पीएमपीएमएल ठेकेदाराच्या फायद्यासाठी? नगरसेवकांचा उपरोधिक सवाल; प्रशासनावर जोरदार टीका

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “एखादा पेपर फुटल्यानंतर.. म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला, तर त्याची शिक्षा फाशी नसते ना? आंबा चोरला, तर समज देणं असतं. आणखी काही चोरलं, त्याची शिक्षा ठरली असते. प्रत्येक गोष्टीला.. फाशी फाशी असं नसतं ना,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.

Web Title: Ncp corporator amol balwadkar has posed a question to chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • chandrakant patil
  • pune news

संबंधित बातम्या

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट
1

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
2

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
3

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.