Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलम 155 गैरवापरप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी

निलंबित करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 11:52 AM
कलम 155 गैरवापरप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी

कलम 155 गैरवापरप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी आली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवदेन देऊन एक मोठी मागणी केली आहे. महसूल विभागातील कलम १५५ च्या कथित गैरवापरप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह इतर सक्षम यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

निवेदनात सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री बावनकुळे यांनी कलम १५५ चा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये न्याय मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

कलम १५५ चा वापर केवळ शुद्धलेखन किंवा लिपिकीय स्वरूपातील चुका दुरुस्त करण्यापुरता मर्यादित असताना त्याचा गैरवापर करून जमिनींच्या मालकी हक्कांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे गंभीर आरोप आहेत. सातबारा उताऱ्यातील नावे कमी करणे, मालकी हक्कांमध्ये बदल करणे तसेच काही प्रकरणांत पुरावे नष्ट करण्यासाठी संचिका गायब करण्यात आल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

सुरवसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नसून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. अशा कठोर कारवाईमुळे भविष्यात कोणताही अधिकारी अधिकारांचा गैरवापर करण्याचे धाडस करणार नाही आणि महसूल विभागात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा : चक्क कारवाईच्या नावाखाली ‘वसुली’? दंडात्मक कारवाई टाळून पैशांची देवाणघेवाण; सोशल मीडियावर संताप

याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांनी कथितरित्या भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळविल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर सक्षम यंत्रणांकडून सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे. आता मंहसूल मंत्री सुरवसे पाटलांच्या मागणीवर काय निर्णय घेतात? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

Web Title: Ncp leader rohan survase patil has made a major demand to revenue minister chandrashekhar bawankule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल…
1

दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल…

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच…
2

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच…

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट
3

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! तब्बल ४८,००० कोटींचे जुने वीज बिल माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! तब्बल ४८,००० कोटींचे जुने वीज बिल माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.