Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववी ते बारावी वयाची ‘ती’ अट शिथिल; खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ च्या आधारे मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2026 | 12:47 PM
खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

खासगी शाळांतील पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नाही

Follow Us
Follow Us:

पुणे : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गटातील शिक्षक पदांसाठी इच्छुक उमेदवारांना वयाची कमाल मर्यादा हा अडथळा राहणार नाही.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ च्या आधारे मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. पवित्र प्रणालीवर उमेदवारांनी नोंदविलेल्या माहितीच्या आधारे पदांसाठी तात्पुरती शिफारस केली आहे. मात्र, नियुक्तीपूर्वी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी बंधनकारक केली आहे.

शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता आवश्यक

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार, खासगी शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीसाठी सेवा शर्तीच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गटातील शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही. मात्र, संबंधित शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निर्धारित मुदतीत प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. इयत्ता ९ वी ते १० वीसाठी उमेदवाराकडे पदवीस्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणी असणे, तर इयत्ता ११ वी ते १२ वीसाठी पदव्युत्तर स्तरावर किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कागदपत्रांची पडताळणी २ ते ५ सप्टेंबरदरम्यान

शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्याचे नियोजन आहे. पात्र उमेदवारांसाठी पदस्थापनेचे समुपदेशन ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. उमेदवारांची संख्या कमी असल्यास ५ सप्टेंबरपूर्वीच नियुक्तीची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कागदपत्र पडताळणी नंतर पात्र उमेदवारांची पोलीस खात्यामार्फत चारित्र्य पडताळणी तसेच नियमानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. अपात्र उमेदवाराला नियुक्ती दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

MSBSHSE SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! SSC Exam 2027 अर्ज प्रक्रिया सुरू, फोटोबाबत विशेष सूचना

Web Title: No maximum age limit applies to posts in private schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • education news
  • pune news

संबंधित बातम्या

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार
1

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क
2

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क

Pune : १७ दिवसांच्या आंदोलनानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; ‘DBTचे पैसे मिळाल्यावरच माघार’
3

Pune : १७ दिवसांच्या आंदोलनानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; ‘DBTचे पैसे मिळाल्यावरच माघार’

तीनशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण; पुण्यातील ‘या’ पेशवेकालीन मंदिर समूहाबद्दल तुम्हाला माहितीये का?
4

तीनशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण; पुण्यातील ‘या’ पेशवेकालीन मंदिर समूहाबद्दल तुम्हाला माहितीये का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.