
PCMC Election Result 2026 Pimpri chinchwad ajit pawar vs mahesh landge live news update
पुण्यासह पिंपरी चिंचवड पालिकेवर कोण वर्चस्व निर्माण करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पिंपरी चिंचवड पालिका ही पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाची पालिका मानली जाते. श्रीमंत पालिका म्हणून देखील पिंपरी चिंचवड पालिकेकडे पाहिले जाते. त्यामुळे ही पालिका आपल्याकडेच रहावी यासाठी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र मतदारांच्या कोणाच्या बाजूने कौल दिला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा : निकाल जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का! या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा
पिंपरी चिंचवड पालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या मतमोजणीमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये एकूण 128 नगरसेवकांसाठी लढत झाली. यामध्ये आता भाजपने 08 जागांवर आघाडीवर मिळवली आहे. मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा भाजप पक्षाने आघाडी घेतली आहे. पिंपरी चिंचवड पालिका ही अजित पवारांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रवादीने 05 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्याचबरोबर शिवसेनेला केवळ एकाच जागेवर आघाडी मिळवण्यात यश आले आहे. पिंपर चिंचवड पालिकेमध्ये कॉंग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला खाते उघडण्यात अद्याप यश आले नाही.
हे देखील वाचा: पुणे ‘दादा’मुक्त होणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अजित पवार आणि भाजप नेते व आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये झालेल्या तू तू मैं मैं वरुन संपूर्ण राज्यात पिंपरी चिंचवड पालिकेची निवडणूक गाजली आहे. महेश लांडगे यांनी अजित पवारांचा केलेला एकेरी उल्लेख त्याचबरोबर अजित पवारांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे महायुती एकमेकांचे पाय ओढत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवारांना यावरुन टीका केली असल्याचे दिसून आले.