Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमीपत्र दिलेल्या विकसकांवर पाणीपुरवठ्याची जबाबदारी, दुर्लक्ष केल्यास…; आयुक्तांचा इशारा

हमीपत्र दिलेल्या विकसकांनी पाणीपुरवठ्याची जबाबदारी टाळू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 02:50 PM
हमीपत्र दिलेल्या विकसकांवर पाणीपुरवठ्याची जबाबदारी, दुर्लक्ष केल्यास...; आयुक्तांचा इशारा

हमीपत्र दिलेल्या विकसकांवर पाणीपुरवठ्याची जबाबदारी, दुर्लक्ष केल्यास...; आयुक्तांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • हमीपत्र दिलेल्या विकसकांवर पाणीपुरवठ्याची जबाबदारी
  • दुर्लक्ष केल्यास कारवाई करणार
  • महापालिका आयुक्तांचा इशारा
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत फ्लॅटधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारत लेखी हमीपत्र देणाऱ्या विकसकांनी ती अट काटेकोरपणे पाळावी, अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या १० एप्रिल २०२३ रोजीच्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरिदे यांच्यासह पुणे महापालिका व पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भामा-आसखेड व आंद्रा पाणीपुरवठा योजनेसह काही महत्त्वाचे प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याने सर्व भागांना शंभर टक्के पाणीपुरवठा करणे सध्या शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनीही विकसकांनी दिलेल्या हमीपत्रांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी विकसक पाणीपुरवठ्याची जबाबदारी टाळतात किंवा त्याचा आर्थिक भार सोसायट्यांवर टाकतात, त्या प्रकरणांत संबंधित महानगरपालिकांनी तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, मंजूर नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) तसेच विकसकांनी सादर केलेली हमीपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा संबंधित योजनेत समावेश आहे की नाही, याची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत अडचणी निर्माण झाल्यास नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या हितसंरक्षणासाठी तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी नियमानुसार कारवाई केली जाईल. भामा-आसखेड योजना पूर्णतः कार्यान्वित होईपर्यंत संबंधित विकसकांवरच पाणीपुरवठ्याची जबाबदारी राहणार आहे. — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

हे सुद्धा वाचा : पुणे ‘झेडपी’ ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमातही ‘प्रथम’ क्रमांकाने निवड

Web Title: Pimpri chinchwad municipal commissioner dr vijay suryavanshi has issued a warning to developers regarding water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Pimpri News

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?
1

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम
2

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
3

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल
4

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.